RCB vs KKR, IPL 2024 10th Match: इंडियन प्रीमियर लीगच्या 17व्या मोसमातील (IPL 2024) दहावा सामना आज म्हणजेच 29 मार्च रोजी बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स (RCB vs KKR) यांच्यात खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे. आरसीबी आणि केकेआर दोघेही आपापले मागील सामने जिंकून येत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने चालू स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्ज विरुद्ध 4 गडी राखून विजय मिळवला आहे. पॉइंट टेबलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सहाव्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी गेल्या सामन्यात विराट कोहलीने सर्वाधिक ७७ धावा केल्या होत्या. गेल्या सामन्यातही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे गोलंदाज चांगलेच महागात पडले.या सामन्यात संघाला त्यांच्याकडून चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा आहे.
दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्स संघाचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध त्याच्या घरच्या मैदानावर होता. या सामन्यात हर्षित राणाच्या उत्कृष्ट षटकाच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने रोमहर्षक सामना 4 धावांनी जिंकला. या सामन्यात स्फोटक फलंदाज आंद्रे रसेल आणि सलामीवीर फिल सॉल्ट यांनीही चांगले योगदान दिले आहे. कोलकाता नाईट रायडर्स सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. (हे देखील वाचा: RCB vs KKR, IPL 2024 10th Match Live Streaming: आज आरसीबी आणि केकेआर यांच्यात होणार चुरशीची लढत, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना)
सर्वांच्या नजरा असतील या दिग्गज खेळाडूकडे
विराट कोहली: आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा या मैदानावर खूप चांगला रेकॉर्ड आहे. विराट कोहलीने 48 च्या सरासरीने फलंदाजी करताना 2673 धावा केल्या आहेत.
फाफ डू प्लेसिस: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसचा या मैदानावर खूप चांगला रेकॉर्ड आहे. या मैदानावर फाफ डू प्लेसिसने 54च्या सरासरीने फलंदाजी करताना 438 धावा केल्या आहेत. गेल्या सामन्यात फाफ डू प्लेसिस लवकर पॅव्हेलियनमध्ये परतला. फाफ डू प्लेसिस या सामन्यात मोठी धावसंख्या करू शकतो.
सुनील नारायण: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सुनील नारायणचा रेकॉर्ड चांगला आहे. सुनील नारायणने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 21 विकेट घेतल्या आहेत. गेल्या सामन्यात सुनील नारायण डावाची सुरुवात करताना दिसला होता. या सामन्यातही सुनील नारायण पॉवर प्लेमध्ये बॅटने चांगले योगदान देऊ शकतो.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत (विकेटकीपर), अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल, महिपाल लोमरोर.
कोलकाता नाइट रायडर्स: फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, नितीश राणा, सुनील नरेन, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, सुयश शर्मा.