
Hardik Pandya: हार्दिक पंड्याने त्याचा भाऊ कृणाल पंड्याचा (Krunal Pandya) 34 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली. त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये, हार्दिकने (Hardik Pandya) मुलगा अगस्त्य आणि कृणालची मुल कवीर आणि वायु यांच्या छायाचित्रासह भावाबद्दलचे प्रेम आणि कौतुक व्यक्त केले.
My big bro! Tough to put into words just how much you mean to me. Always there, always in my corner, and the best KP papa to Agu. I’m so proud of how far we’ve come, how much we’ve grown together and now we get to see our beautiful boys grow up together too. Love you always bhai… pic.twitter.com/L3ygz66shF
— hardik pandya (@hardikpandya7) March 24, 2025
हार्दिकने त्याच्या भावनिक पोस्टमध्ये लिहिले, “माझा मोठा भाऊ! तू माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहेस हे शब्दात सांगणे कठीण आहे. नेहमीच मनाच्या कोपऱ्यात, अगस्त्यासाठी सर्वोत्तम केपी बाबा. आम्ही किती पुढे आलो आहोत, आम्ही किती एकत्र मोठे झालो आहोत याचा मला खूप अभिमान आहे आणि आता आम्हाला आमच्या सुंदर मुलांना एकत्र वाढताना पाहायला मिळते. मी नेहमीच तुला प्रेम करतो. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.”