Happy Birthday Suresh Raina: डेब्यू मॅचमधील शून्य कामगिरी ते टी-20 मध्ये शतकी खेळी करणाऱ्या सुरेश रैना याच्याबद्दलचे काही मजेदार किस्से, घ्या जाणून
सुरेश रैना (Photo Credits: File Photo)

भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Team) नंबर चार फलंदाज आणि आज वाढदिवस साजरा करणारा स्टार क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina) त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये राष्ट्रीय संघाच्या फलंदाजीसाठी एकेवेळी रैना सर्वोत्तम मानला जायचा. आजवरच्या संपूर्ण कारकीर्दीत रैना आक्रमक फलंदाजी आणि सामने जिंकण्याची क्षमतेसाठी ओळखला जायचा. आज टीम इंडियाच्या मधली फळी संघर्ष करताना दिसत आहे, पण रैना हा एकेकाळी टीम इंडियाचा मधल्या फळीतील सर्वोत्तम फलंदाज होता. टीम इंडिया तसेच चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघासाठी त्याने केलेल्या तुफानी कामगिरीने त्याला चांगली फॅन फॉलोइंगही मिळवली आहे. रैनाचा जन्म 1986 साली 27 नोव्हेंबरला झाला होता. 2011 च्या आयसीसी विश्वचषकातील त्याच्या महत्त्वपूर्ण खेळीमुळे देशाला स्पर्धा जिंकण्यास त्याने महत्वाची भूमिका बजावली होती.

रैनाला सध्या टीम इंडियात त्याला स्थान मिळत नसले तरीही रैना आयपीएल (IPL) मधील त्याच्या फलंदाजीने चाहत्यांच्या चांगलेच मनोरंजन करत आहे. त्याच्या 33 व्या वाढदिवशी टीम इंडियाच्या मधल्या फळीतीलविध्वंसक फलंदाजाविषयी काही रोचक किस्से जाणून घेऊया:

1. सुरेश रैना, भारताच्या सर्वोत्कृष्ट वनडे फलंदाजांपैकी एक असला तरीही त्याच्या 50 षटकांच्या कारकिर्दीस त्याची सुरुवात चांगली नव्हती. रैनाने श्रीलंका (Sri Lanka) विरुद्ध 2005 मध्ये आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये पदार्पण केले. पहिला सामना रैनासाठी संस्मरणीय राहिला नाही आणि पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. याउलट, रैनाने कसोटी पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले जे त्याने श्रीलंकाविरुद्धचा लगावले होते. आणि आजवर टेस्ट कारकिर्दीतील ते त्याचे एकमेव शतक आहे.

2. 2010 मध्ये वेस्ट इंडिजमधील वर्ल्ड टी-20 क्रिकेटमध्ये रैनाने दक्षिण आफ्रिकाविरूद्ध रैनाने 101 धावांची खेळी केली. यासह टी-20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा रैना पहिला भारतीय फलंदाज ठरला. वर्ल्ड टी-20 मध्ये शतक करणारा रैना हा एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे.

3. वयाच्या 23 व्या वर्षी रैना टी-20 क्रिकेटयामध्ये सर्वात युवा भारतीय कर्णधार बनला. याशिवाय, कोणत्याही स्वरूपात भारताचे नेतृत्व करणारा तो दुसरा खेळाडू बनला. माजी क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांनीवयाच्या 21 व्या वर्षी भारताचे नेतृत्व केले होते.

4. टीम इंडियाच्या या स्टायलिश डावखुरा हा पहिला भारतीय फलंदाज आहे ज्याने खेळाच्या तिन्ही स्वरूपात शतक झळकावले. वनडे सामन्यात रैनाने 5 आणि टी -20 आणि कसोटी सामन्यात एकेक शतकं केली आहेत. वनडे सलामी फलंदाज रोहित शर्मा हा भारतासाठी हा पराक्रम करणारा दुसरा फलंदाज आहे.

5. 2019 आयपीएल पर्यंत कारकीर्दीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रैनाच्या नावावर होता. 2019 च्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध झालेल्या सामन्यात आयपीएलमध्ये 5000 धावा करणारारैना पहिला फलंदाज ठरला.

6. यापूर्वी 2015 मध्ये रैनाने 2015 मध्ये ‘मेरठिया गँगस्टर्स’ नावाच्या बॉलिवूड चित्रपटासाठीही गाणे गायले होते, ‘तू मिले सब मिला’ नावाचा हा एक रोमँटिक गाणे रैनाने गायले आहे. गायकीच्या कौशल्याशिवाय भारतीय फलंदाज देखील सॅक्सोफोन वाजविण्यास सक्षम आहे.

रैनाला सध्या टीम इंडियामध्ये स्थान मिळत नसले तरीही त्याने पुनरागमन करण्याच्या आशा सोडल्या नाही आहे. रैनाचा स्ट्राइक रेट 135 च्या जवळपास आहे जो खूप चांगला आहे. रैनाचा अनुभव, कठीण परिस्थितीत सामना संपवण्याचे कौशल्य टीम इंडियासाठी खूप महत्वाचे आहे. यावेळी भारताकडे कोणतेही विश्वासार्ह फिनिशर नाहीत. अशी अपेक्षा आहे की बर्थडे बॉय रैना लवकरच टीम इंडियाच्या निळ्या जर्सीमध्ये दिसला.