CSK Road To Final: एमएस धोनीसाठी चेन्नई सुपर किंग्जला अंतिम फेरीत पोहोचवणे सोपे नव्हते, येथे जाणून घ्या सीएसकेचा या मोसमात कसा होता प्रवास
CSK (Photo Credit - Twitter)

इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या (IPL 2023) मोसमाचा अंतिम सामना 28 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (GT vs CSK) यांच्यात होणार आहे. आयपीएलच्या या मोसमातील दुसरा क्वालिफायर सामना शुक्रवारी गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (GT vs MI) यांच्यात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला गेला. क्वालिफायर 2 मध्ये, गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 62 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. (हे देखील वाचा: Sunil Gavaskar On Hardik Pandya: हार्दिक पांड्याचे कर्णधारपद पाहून प्रभावित झाले सुनील गावस्कर, म्हणाले- 'त्याला पाहुन येते धोनीची आठवन')

चेन्नई सुपर किंग्सने 2019 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या 41 वर्षीय एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली 11व्यांदा आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता 28 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचा या मोसमाचा प्रवास खूपच रंजक राहिला आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास काहीसा असा होता

पहिला सामना: चेन्नई विरुद्ध गुजरात

आयपीएलच्या 16व्या मोसमातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला. या सामन्यात गुजरातने चेन्नईचा 5 गडी राखून पराभव केला.

दुसरा सामना: चेन्नई विरुद्ध लखनौ

आयपीएलच्या 16व्या हंगामातील सहाव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने शानदार पुनरागमन केले. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळताना चेन्नई सुपर किंग्सने 12 धावांनी सामना जिंकला.

तिसरा सामना: चेन्नई विरुद्ध मुंबई

आयपीएलच्या 16व्या मोसमातील 12व्या सामन्यातही चेन्नई सुपर किंग्जने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा 7 विकेटने पराभव केला.

चौथा सामना: चेन्नई विरुद्ध राजस्थान

आयपीएलच्या 17 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना राजस्थान रॉयल्सशी झाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा 3 धावांनी पराभव करत रोमहर्षक सामना जिंकला.

पाचवा सामना: चेन्नई विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

आयपीएलच्या 24 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 8 धावांनी पराभव केला. या विजयासह सीएसकेने पुन्हा एकदा शानदार पुनरागमन केले.

सहावा सामना: चेन्नई विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

आयपीएलच्या 29 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा 7 गडी राखून पराभव करत विजयी मालिका कायम ठेवली.

सातवा सामना: चेन्नई विरुद्ध कोलकाता

आयपीएलच्या 33व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा 49 धावांनी पराभव केला.

आठवा सामना: चेन्नई विरुद्ध राजस्थान रॉयल्स

आयपीएलच्या 37 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा या हंगामात दुसऱ्यांदा पराभव केला. राजस्थान रॉयल्सने हा सामना 32 धावांनी जिंकला.

नववा सामना: चेन्नई विरुद्ध पंजाब किंग्ज

आयपीएलचा 41वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात झाला. या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा 4 विकेट्सने पराभव केला.

दहावा सामना: चेन्नई विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स

आयपीएलच्या 45व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना रंगला. या सामन्यात पाऊस पडला. दोन्ही संघांना 1-1 गुण मिळाले.

अकरावा सामना: चेन्नई विरुद्ध पंजाब किंग्ज

आयपीएलचा 49वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जचा 6 गडी राखून पराभव करत सामना जिंकला.

बारावा सामना: चेन्नई विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

आयपीएलच्या 55व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 27 धावांनी पराभव केला.

तेरावा सामना: चेन्नई विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स

आयपीएलचा 61 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. कोलकाताने हा सामना 6 विकेटने जिंकला.

चौदावा सामना: चेन्नई विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

आयपीएलच्या 67 व्या लीगमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 77 धावांनी पराभव केला आणि या विजयासह चेन्नई सुपर किंग्जने प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले.

क्वालिफायर-1

आयपीएल 2023 चा पहिला क्वालिफायर सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. या हाय-व्होल्टेज सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरातचा 15 धावांनी पराभव करत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

अंतिम सामना

आयपीएल 2023 ची ट्रॉफी जिंकण्यासाठी गुजरात टायटन्स चेन्नई सुपर किंग्सशी भिडणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून हा सामना खेळवला जाईल. चेन्नई सुपर किंग्जने 11व्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे.