GT vs PBKS, IPL 2024 17th Match Stats And Record Preview: गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज आमनेसामने, आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' मोठे विक्रम
GT vs PBKS (Photo Credit - X)

GT vs PBKS, IPL 2024 17th Match: इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 17 वा सामना आज गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज (GT vs PBKS) यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. लीगच्या 17व्या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत चांगली झाली आहे. दोन्ही संघांनी दोन सामने जिंकले असून एक सामना गमावला आहे. आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जसाठी आजचा सामना महत्त्वाचा असेल. या मोसमात पंजाब किंग्जने आतापर्यंत 3 पैकी 2 सामने गमावले आहेत. पंजाब किंग्ज 2 गुणांसह गुणतालिकेत 8 व्या स्थानावर आहे. दुसरीकडे, युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने त्यांच्या 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. गुजरात टायटन्स संघ 4 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत हा सामना जिंकल्यास त्यांना मोठी झेप घेता येईल.

आजच्या स्पर्धेत होऊ शकतात हे मोठे विक्रम 

पंजाब किंग्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपला 50 वा सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब किंग्जचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन याला 50 बळींचा टप्पा गाठण्यासाठी आणखी चार विकेट्सची गरज आहे.

गुजरात टायटन्सचा स्फोटक फलंदाज डेव्हिड मिलरला इंडियन प्रीमियर लीगमध्ये 200 चौकारांचा टप्पा गाठण्यासाठी पाच चौकारांची गरज आहे.

पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनला इंडियन प्रीमियर लीगमध्ये 100 झेल पूर्ण करण्यासाठी दोन झेल आवश्यक आहेत.

पंजाब किंग्जचा घातक फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनला इंडियन प्रीमियर लीगमध्ये 1000 धावा पूर्ण करण्यासाठी आणखी 89 धावांची गरज आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये पंजाब किंग्जचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंगला 150 बळींचा टप्पा गाठण्यासाठी एका विकेटची गरज आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये पंजाब किंग्जचा स्टार फलंदाज जॉनी बेअरस्टोला 400 चौकारांचा टप्पा गाठण्यासाठी आणखी एका चौकाराची गरज आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये गुजरात टायटन्सचा स्टार फलंदाज साई सुदर्शनला 100 चौकारांचा टप्पा गाठण्यासाठी आणखी दोन चौकारांची गरज आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये गुजरात टायटन्सचा स्टार गोलंदाज जोशुआ लिटलला 150 बळींचा टप्पा गाठण्यासाठी पाच विकेट्सची गरज आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये गुजरात टायटन्सचा स्टार फलंदाज मॅथ्यू वेडला 450 चौकारांचा टप्पा गाठण्यासाठी आणखी नऊ चौकारांची गरज आहे.