सचिन तेंडुलकर ने केला मोठा खुलासा, टीम इंडियासाठी वनडेमध्ये ओपनिंग करण्यासाठी करावी लागली होती विनंती
सचिन तेंडुलकर (Photo Credit: Getty)

क्रिकेटचा देव म्हटले जाणारे सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या नावावर क्रिकेट जगतातील अनेक रेकॉर्ड आहे. टेस्ट आणि वनडेमधील आकडेच सांगतात त्याच्या महानतेची कथा. पण, 1994 मध्ये भारतीय संघ (Indian Team) व्यवस्थापनासमोर तेंडुलकरने वनडेमध्ये डावाची सुरुवात करण्यासाठी भीक मागितली नसती तर त्याच्या कारकीर्दीला वेगळा आकार मिळाला असता. सचिनच्या प्रतिभेवर कोणीही प्रश्न विचारू शकत नाही. त्याची अशी शैली साध्य करण्यासाठी त्याला नेट्समध्ये जास्त तास सराव करावा लागायचा. तेंडुलकरने नुकताच एक मजेदार खुलासा केला, ज्यामध्ये त्याने सांगितले की प्रतिद्वंती गोलंदाजांवर प्रभुत्व मिळवण्यासाठी भारतीय फलंदाजांची वेगळी कल्पना होती. (एमएस धोनी भारतातील Most Admired Men; विराट कोहली, सचिन तेंडुलकर पिछाडीवर, मेरी कॉम Most Admired Women)

सचिनने सलामीला फलंदाजीला येत अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. टेस्ट आणि वनडेमध्ये सर्वांधिक धावा केल्या असूनही सुरुवातीला सचिनला सलामीला येण्यासाठी अनेक विनवण्या कराव्या लागल्या होत्या. सचिन म्हणाला, "जेव्हा मी 1994 मध्ये भारतासाठी सलामीला सुरुवात केली तेव्हा सर्व संघांची रणनीती विकेट सुरक्षित ठेवण्याची होती. मी काहीतरी वेगळा विचार करण्याचा प्रयत्न केला. मला वाटले की, पुढे येऊन मी गोलंदाजांवर वर्चस्व करू शकतो. पण यासाठी मला विनवण्या कराव्या लागल्या आणि मला सलामीला पाठवण्यासाठी संधी द्यावी अशी भीक मागावी लागली. मी अयशस्वी झाल्यास, मी पुन्हा तुझ्याकडे येणार नाही."

यानंतर सचिनने आपले शब्द पळाले आणि 1994 मध्ये न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध तो पहिल्यांदा सलामीला उतरला. आणि टीम इंडियासाठी 49 चेंडूत 82 धावा तुफानी खेळी केली. यासह तेंडुलकरने सलामी फलंदाजी म्हणून आपले स्थान पक्क केलं. सलामीवीर म्हणून सचिनने पहिल्या पाच डावात क्रमशः 82, 63, 40, 63 आणि 73 धावा केल्या. त्यानंतर त्याने लवकरच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलंबोमध्ये पहिले शतक झळकावले. या सामन्यात सचिनने 110 धावा केल्या. यानंतर सचिनने 49 वनडे आणि 100 आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. मास्टर ब्लास्टरने वनडेमध्ये 18,426 धावा केल्या. वनडेच्या इतिहासातील आजवर कोणत्याही फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.