एमएस धोनी भारतातील Most Admired Men; विराट कोहली, सचिन तेंडुलकर पिछाडीवर, मेरी कॉम Most Admired Women
विराट कोहली आणि एमएस धोनी

टीम इंडियाचा विश्वचषक विजेता माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) क्रिकेटपासून काही महिन्यांपासून दूर आहे. असे असूनही धोनीची लोकप्रियता कमी झालेली नाही. याबाबत नुकत्याच एका सर्वेक्षणामध्ये खुलासा झाला आहे. या सर्वेक्षणानुसार एमएस धोनी हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नंतर भारतातील सर्वात लोकप्रिय आणि प्रशंसनीय व्यक्ती आहेत. YouGov ने केलेल्या वार्षिक सर्वेक्षणात पंतप्रधान मोदी यांना सर्वाधिक 15.66 टक्के मते मिळाली, तर धोनीला 8.58 टक्के मते मिळाली आहेत. त्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर रतन टाटा, चौथ्या क्रमांकावर बराक ओबामा, बिल गेट्स पाचव्या क्रमांकावर आणि अमिताभ बच्चन सहाव्या क्रमांकावर आहेत. उल्लेखनीय म्हणजे, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)  लोकप्रियतेत धोनीच्या मागे आहे. (ICC T20I रँकिंगमध्ये रोहित शर्मा 8 व्या स्थानावर; विराट कोहली, शिखर धवन यांनाही बढती)

धोनी व्यतिरिक्त कोहली आणि सचिननेही पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे. पण, सचिन 5.81 टक्के मतांनी सहाव्या क्रमांकावर आहे. कोहलीला 4.46 टक्के मतं मिळाली आहेत आणि तो 7 व्या क्रमांकावर आहेत. या यादीत प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि लिओनेल मेस्सी (Lionel Messi) यांचादेखील समावेश आहे पण, हे दोघे देखील धोनीला पछाडू शकले नाही. पण, रोनाल्डो मेस्सीपेक्षा वरचढ राहिला आहे. रोनाल्डोला 2.95 टक्के मते मिळाली तर मेस्सीला 2.32 टक्के मते मिळाली. याचा अर्थ असा की, भारतात मेस्सीपेक्षा रोनाल्डोची लोकप्रियता जास्त आहे.

दुसरीकडे, महिलांच्याबद्दल बोलले तर, 6 वेळची जागतिक विजेती बॉक्सर मेरी कॉम (Mary Kom) हिने 10.36 टक्के मतं घेऊन प्रथम स्थान मिळवले आहे. मेरी एकमेव खेळाडू आहे जिला या यादीत स्थान मिळालं आहे. याचबरोबर, किरण बेदी (Kiran Bedi) आणि भारताची 'स्वर कोकिळा' लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला आहे.