IPL 2020 रद्द झाल्यास एमएस धोनीच्या पुनरागमनावर गौतम गंभीरने केली भविष्यवाणी, Replacement साठी 'या' विकेटकीपर-फलंदाजाचे केले समर्थन
गौतम गंभीर आणि एमएस धोनी (Photo Credit: Getty)

भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) म्हणाला की, आयपीएल 2020 रद्द झाल्यास महेंद्र सिंह धोनीसाठी (Mahendra Singh Dhoni) भारतीय संघात (Indian Team) पुनरागमन करणे कठीण होईल. धोनीला कोणत्या आधारावर निवडले पाहिजे असं गंभीर म्हणाला. आयसीसी विश्वचषक 2019 नंतर धोनी कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. धोनी आयपीएलमध्ये पुनरागमन करणार होता, परंतु कोरोना व्हायरसमुळे टूर्नामेंट 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आणि महाराष्ट्रासह अन्य राज्यात आता लॉकडाउनचा कालावधी वाढवल्याने यंदा टूर्नामेंट रद्द होण्याच्या मार्गावर आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या घटना लक्षात घेता ही स्पर्धा घेणे शक्य नाही त्यामुळे, टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी धोनीची निवड कोणत्या आधारावर केली जाईल असा प्रश्न गंभीरने विचारला. (एमएस धोनी चे 'हे' 7 रेकॉर्ड जे मोडणे जवळजवळ अशक्य आहे, जाणून व्हाल स्तब्ध)

“यंदा आयपीएल न झाल्यास एमएस धोनीला पुनरागमन करणे फार कठीण जाईल. गेल्या एक-दीड वर्षापासून तो खेळत नसल्यामुळे कोणत्या आधारावर त्याची निवड केली जाऊ शकते,” स्टार स्पोर्ट्स ’क्रिकेट कनेक्ट चॅट शो’ वर बोलताना गंभीरने मत व्यक्त केले. पुढे गंभीरने धोनीच्या जागी युवा विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंतच्या जागी केएल राहुलचे समर्थन केले. "धोनीच्या योग्य जागा केएल राहुल असू शकतो. जेव्हापासून त्याने व्हाइट-बॉल क्रिकेटमध्ये ‘कीपिंग ग्लोव्ह्ज’ परिधान केले आहेत, तेव्हापासून मी त्याची कामगिरी, फलंदाजी आणि कीपिंग पाहिली आहे. साहजिकच त्याची कीपिंग धोनी इतकी चांगली नाही, पण जर तुम्ही टी-20 क्रिकेट पाहत असाल तर राहुल एक युटिलिटी खेळाडू आहे आणि तो तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, ” गंभीर पुढे म्हणाला.

तत्पूर्वी, माजी भारतीय निवडकर्ता क्रिस श्रीकांतनेही म्हटले होते की, आयपीएलच्या अनुपस्थितीत धोनीला पुनरागमन करणे कठीण होईल. "मी मुत्सद्दी होणार नाही. मी निवड समितीचा अध्यक्ष असतो तर मी काय करावे याबद्दल बोलत आहे. आयपीएल झाले नाही तर त्याच्या (धोनी) आशा खूपच कमी आहेत, असे स्टार स्पोर्ट्सच्या शो क्रिकेट कनेक्टिव्हवरील श्रीकांत यांनी सांगितले.