गौतम गंभीर आणि केविन पीटरसन (Photo Credits: Getty)

कोविड-19 मुळे संपूर्ण जग ठप्प झाले आहे आणि क्रिकेट जगही यातून पुढे आलेला नाही. दरम्यान, इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटर केविन पीटरसन (Kevin Pietersen) सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी जोडला गेला आहे. पीटरसन आजकाल सोशल मीडियावर बराच सक्रिय झाला आहे. त्याने गौतम गंभीरला (Gautam Gambhir) ट्विटरच्या माध्यमातून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय क्रिकेटरने पलटवार केला आणि प्रत्युत्तरात इंग्लंडचा (England) क्रिकेटर स्वत: ट्रोल झाला. गंभीर आणि पीटरसन स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट कनेक्ट शोमध्ये सहभागी होणार आहेत. स्टार स्पोर्ट्सने याबद्दल एक ट्विट केले होते, ज्यात पीटरसन, गंभीर आणि डॅनी मॉरिसन यांचा फोटो आहे. या ट्विटमध्ये जो फोटो पोस्ट करण्यात आला आहे त्यावर गंभीरच्या चेहऱ्यावर हास्य नाही, यावर पीटरसनने गंभीरला ट्रोल केले आणि म्हणाला की, 'गंभीरचे हास्य आपण आणू शकतो का?' यावर गंभीरने एक जुना फोटो शेअर करून पीटरसनला ट्रोल केले. (IPL 2020 रद्द झाल्यास एमएस धोनीच्या पुनरागमनावर गौतम गंभीरने केली भविष्यवाणी, Replacement साठी 'या' विकेटकीपर-फलंदाजाचे केले समर्थन)

"लेजेंड, पण मला हसण्याची बरीच करणं दिली आहेत. त्यापैकी एक 2008 चेन्नई कसोटी दरम्यान आला होता. माझ्या मते, स्कोरकार्ड पाहून दिसत आहे की केविन पीटरसनला एका पाईचकरने एलबीडब्ल्यू आऊट केले," असे गंभीरने पीटरसनला दिमाख्यात उत्तर दिले.

गंभीरने डिसेंबर 2008 मध्ये भारत आणि इंग्लंड चेन्नई कसोटीचा एक फोटो शेअर केला होता, त्यात युवराज सिंह (Yuvraj Singh) उर्वरित भारतीय खेळाडूंसह पीटरसनची विकेट साजरी करत आहे. 2008 चेन्नई कसोटीनंतर पीटरसनने युवराजला 'पाईचकर' गोलंदाज म्हणवून वाद निर्माण केला होता. युवीने अनेकदा पीटरसनला बाद केले आणि दोघेही पाईचकरबद्दल एकमेकांशी विनोद करत असतात. नुकतेच सोशल मीडियावर युवराजनेही पीटरसनला या विधानासाठी ट्रोल केले होते. सध्या कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाउन करण्यात आले आहे. अशा स्थितीत क्रिकेटपटू सोशल मीडियाद्वारे एकमेकांशी संवाद साधत आहे आणि खावी मजेदार गोष्टींचा खुलासा करत चाहत्यांचे मनोरंजन करत आहे.