श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज अरविंदा डी सिल्वा यांनी 2011 आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना फिक्स झाल्याचे श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगामगे यांनी लादलेले आरोपाचे खंडन केले. वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान भारतीय संघ आणि श्रीलंका संघात सहभागी खेळाडू, निवडकर्ते आणि इतर सर्व जणांच्या प्रतिष्ठेला कलंकित करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल डी सिल्वा यांनी महिंदानंदला फटकारले. डी सिल्वा यांनी बीसीसीआय आणि भारत सरकारला या संदर्भात चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. भारत-श्रीलंकामध्ये 2011 मुंबईतील वानखेडे मैदानात झालेला विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स होता असा दावा श्रीलंकेचे माजी क्रीडा मंत्री अलुथगमगे यांनी केला. त्यांच्या या दाव्यानंतर चर्चांना उधाण आले. सामन्यात शेवटच्या क्षणाला संघात मुद्दाम बदल करण्यात आले असाही दावा माजी क्रीडामंत्र्यांनी केला होता. त्यानंतर आता माजी कर्णधार आणि तत्कालीन श्रीलंका संघाचे मुख्य निवडकर्ते डी सिल्वा यांनी या प्रकरणी मत व्यक्त केले. (2011 भारत-श्रीलंका वर्ल्ड कप फायनल फिक्सिंगच्या माजी क्रीडा मंत्र्यांच्या आरोपावर कुमार संगकारा, महेला जयवर्धने यांचं उत्तर, पाहा काय म्हणाले)
डी स्लिवा म्हणाले की फिक्सिंगसारख्या आरोपामुळे भारतीय क्रिकेटपटूंसह अनेकांना त्रास झाला, ज्यांनी पात्रतेने वर्ल्ड कप जिंकला. दिग्गज सचिन तेंडुलकर आणि कोट्यावधी भारतीय चाहत्यांच्या हितासाठी आयसीसी, बीसीसीआय आणि एसएलसीला या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती त्यांनी केली. 2011 मध्ये डी सिल्वा श्रीलंका संघाचा निवडकर्ता होता. “जेव्हा असे गंभीर आरोप केले जातात तेव्हा त्याचा बर्याच लोकांना त्रास होतो. या प्रकरणात केवळ आपणच नाही तर निवडकर्ते, खेळाडू आणि संघ व्यवस्थापन पण भारतीय क्रिकेटपटू ज्यांनी पात्रतेने जागतिक जेतेपद जिंकले. आम्हाला आवडणाऱ्या चांगल्या खेळासाठी आम्हाला हे सर्व एकदा पूर्ण करण्याची गरज आहे,” डी सिल्वाने 'द संडे टाइम्स'ला सांगितले.
ते पुढे म्हणाले, “प्रत्येक वेळी आपण त्यांना असंच खोटं बोलून देऊ शकत नाही. म्हणूनच मला असं वाटतं की आयसीसी, बीसीसीआय आणि एसएलसी तिघांनीही सरळ हा सामना फिक्स होता का याचा तपास करावा. सचिन तेंडुलकर सारखा महान फलंदाज आपल्या समृद्ध कारकिर्दीत एक विश्वचषक जिंकला. त्याच विजेतेपदावर अशा प्रकारे प्रश्न उपस्थित केल्याने त्याच्या प्रतिमेला देखील तडा जाऊ शकतो. त्यामुळे किमान सचिन आणि त्याच्या असंख्य चाहत्यांसाठी तरी भारत सरकार आणि क्रिकेट बोर्डाने या प्रकरणाची चौकशी करावी आणि तपासाला सुरुवात करावी.”