वर्नोन फिलँडर (Photo Credits: Twitter)

Vernon Philander Brother Shot Dead: दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज वर्नोन फिलेंडरच्या (Vernon Philander) घरच्यांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. फिलँडरचा धाकटा भाऊ याची बुधवार दुपारी केप टाऊन (Cape Town) येथील रेवेन्समेड (Ravensmead) येथे घराबाहेर काही अंतरावर गोळी झाडून हत्या करण्यात अली आहे. स्थानिक अहवालानुसार, टायरोन शेजाऱ्याला पाण्याची ट्रॉली देण्यासाठी गेला होता जेव्हा त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आली. आफ्रिकन न्यूज एजन्सीच्या (ANA) रिपोर्टरने सांगितले की, बुधवारी केप टाउन येथे काही अज्ञात लोकांनी फिलँडरच्या भावावर घराबाहेर गोळी झाडल्या त्यानंतर जागीच त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय टायरोन (Tyrone) शेजाऱ्याला पाणी देण्यासाठी जात असताना काही बंदूकधारकांनी त्याच्यावर अचानक गोळ्या झाडल्या आणि तो जमिनीवर पडला. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत परंतु अद्याप मारेकरी आढळले नाहीत. नुकत्याच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या फिलँडरने लोकांच्या सहकार्यासाठी आभार मानले.

त्याने माध्यम आणि इतरांना विनंती केली की त्यांनी कुटुंबाच्या गोपनीयतेचा सन्मान करावा आणि पोलिसांचे कार्य अधिक कठोर करू नये. फिलँडरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, "आज माझ्या कुटुंबातील एकाची निर्घृण हत्या करण्यात आली, ही घटना माझ्या गावी घडली. मी लोकांना विनंती करतो की या कठीण परिस्थितीत माझ्या कुटुंबाला एकटे राहण्याची गरज आहे, त्यांच्या एकाकीपणाचा आदर केला पाहिजे. आता हा खून हा पोलिसांच्या तपासाचा विषय आहे आणि पोलिसांना त्यांचे काम करण्याची परवानगी द्यावी असे आम्ही या प्रकरणात मीडियाला आदरपूर्वक सांगू इच्छितो जेणेकरून हा संपूर्ण तपास योग्य प्रकारे करता येईल. यावेळी घटनेशी संबंधित आम्हाला कशाचीही माहिती नाही. टायरोन नेहमीच आपल्या सर्वांच्या हृदयात असते. त्याचा आत्मा शांती लाभो."

फिलँडरने दक्षिण आफ्रिकेकडून 64 कसोटी सामन्यात 224 विकेट घेतल्या. फिलँडर 2012 मध्ये आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकी संघाचा सदस्य होता.