Former Ranji Cricketer Shekhar Gawli | (Photo Credits: Facebook)

माजी रणजीपटू शेखर गवळी (Former Ranji Cricketer Shekhar Gawli) हे बेपत्ता आहेत. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इगतपुरी (Igatpuri) तालुक्यात पर्यटनासाठी गेले असता ते सुमारे 250 फूट खोल दरीत ते कोसळल्याचे वृत्त आहे. ही घटना मंगळवारी (1 संप्टेंबर) सांयकाळी 5.30 वाजनेच्या दरम्यान घडली. शेखर गवळी (Shekhar Gawli)) दरीत कोसळल्याची माहिती समजताच तातडीने शोध मोहीम सुरु करण्यात आली. मात्र, गर्द अंधार झाल्याने हे शोधकार्य थांबविण्यात आले आहे. उद्या (2 सप्टेंबर) सकाळी पुन्हा एकदा शोधकार्य सुरु केले जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

घटनेबाबात प्राप्त माहिती अशी की, शेखर गवळी हे आपल्या मित्रांसोबत इकतपुरी तालुक्यात पर्यटनासाठी गेले होते. पर्यटनादरम्यान ते हॉटेल मानस परिसरातील एका ठिकाणी गेल होते. या ठिकाणी उंच कठडा आहे. या कठड्यावर उभे राहून सेल्फी काढण्याचा मोह गवळी यांना टाळता आला नाही. नेमका हा मोहच त्यांच्या अंगाशी आला. सेल्फी काढत असताना शेखर गवळी हे सुमारे 250 फूट खोल दरीत कोसळले.

दरीत कोसळलेल्या शेखर गवळी यांना त्यांचे मित्र आणि स्थानिक ग्रामस्थांनी आवाज देऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणताही प्रतिसाद आला नाही. गवळी हे ज्या दरीत कोसळले त्या दरीत पाण्याचा प्रवाहही अधिक प्रमाणावर आहे. त्यामुळे आपत्कालीन यंत्रणेला याबाबत ताबडतोब कळविण्यात आले. (हेही वाचा, सचिन तेंडूलकर आणि विनोद कांबळी अखेर सापडले! मास्टर ब्लास्टरने पारंपरीक पोषाखातील 1993 मधील टीमचा फोटो शेअर करत WV Raman ला दिले उत्तर)

आपत्कालीन यंत्रणेनेही शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायंकाळचा अंधार अधिक गडद होत गेला आणि शोधकार्यात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे हे शोधकार्य थांबविण्यात आले आहे. आता हे शोधकार्य उद्या पुन्हा सुरु करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.