India Cricket Team From 1993 (Photo Credits: Twitter)

Missing Sachin Tendulkar and Vinod Kambli Found: सोशल मीडियावर क्रिकेटर्सची जुनी छायाचित्रे व्हायरल होत असतात. प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी आपल्या ट्विट हँडलवरून भारतीय क्रिक्रेट संघाचा (India National Cricket Team 1993) मधील एक पारंपरीक पोषाखातील फोटो शेअर केला. हा फोटो पोस्ट करताना त्यांनी युजर्संना तुमच्यातील किती जण या फोटोतील क्रिकेटपटूंना ओळखू शकतील, असा प्रश्न विचारला.

या फोटोमध्ये सर्व क्रिकेटर्स वेगवेगळ्या पोशाखात दिसत आहेत. यात 1983 मध्ये आपल्या कर्णधारपदी पहिल्यांदाचं भारताला विश्वविजेता बनवणारे कपिल देव (Kapil Dev) पंजाबी वेशभूषेत दिसत आहेत. तसेच डब्ल्यू.व्ही. रमण (WV Raman) लुंगी आणि कुर्तामध्ये उभे असल्याचे दिसत आहे. किरण मोरे, माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन, भाजपचे माजी खासदार आणि क्रिकेटपटू नवजोतसिंग सिद्धू हेदेखील या फोटोमध्ये त्यांच्या पारंपरीक पोशाखात दिसत आहेत. त्यामुळे अनेकांना त्यांना ओळखणं कठीण जात आहे. (हेही वाचा - IPL 2020 Update: सुरेश रैनासाठी चेन्नई सुपर किंग्सचे दार बंद? 13व्या सत्रातून एकाएकी माघार घेतल्याने रैना 2021 च्या लिलावात उतरण्याची शक्यता)

दरम्यान, या फोटोवर प्रतिक्रिया देताना माजी क्रिकेटर डब्ल्यू. व्ही. रमण यांनी 'दिग्गज सचिन तेंडुलकर आणि माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी या फोटोमध्ये नाहीत? असा प्रश्न विचारला आहे. त्यानंतर मास्टर ब्लास्टरने रमण यांना उत्तर दिलं आहे. सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून विनोद कांबळी आणि स्वत: चा फोटो शेअर करत 'आम्ही इथे आहोत,' असं म्हटलं आहे.

या फोटोमध्ये सचिन हातात छत्री धरून उभा आहे आणि हे दोघेही मराठी वेशभूषेत दिसत आहेत. एका ट्विटर युजर्सने वेगवेगळ्या वेशभूषेतील फोटो काढण्यामागं कारण विचारलं होतं. यावर रमण यांनी युजर्सला फोटो काढण्यामागचं कारण सांगितलं आहे.