माँटी पनेसार (Photo Credit: Getty)

इंग्लंड (England) क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू माँटी पनेसार (Monty Panesar) याने नुकतेच आपल्या 'द फुल मॉन्टी' या पुस्तकाचे लेखक म्हणून समोर आला. जून-जुलैमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघाला आपल्या पुस्तकाच्या प्रती भेट दिल्या होत्या. आणि 37 वर्षीय फिरकीपटूने क्रिकेटच्या मैदानाबाहेर दुसरी इंनिंग्स सुरु करत लंडनचा (London) महापौर होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इंग्लंडचे सध्याचे महापौर सादिक खान यांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यामुळे या पदासाठी आपल्याला स्पर्धेत उतरायला आवडेल असं मॉन्टी म्हणाला.

माँटी म्हणाला की, “ मला राजकारणाची आवड आहे आणि मी लंडनचा रहिवासी आहे, मला लंडनबद्दल माहित आहे म्हणून कदाचित एकदा सादिक खान यांच्या कार्यकाळ झाल्यानंतर लंडनच्या महापौरपदाची जबाबदारी ते माझ्याकडे सोपवतील." शिवाय, जर मी निवडणूक लढवली, तर तुम्ही मला मत द्याल का?” असा सवाल मॉन्टी पानेसारने केला. लव स्पोर्ट्स रेडिओवरील एका कार्यक्रमादरम्यान माँटी म्हणाला.

लंडनमध्ये 7 मे 2020 रोजी महापौरपदासाठी निवडणुका पार पडणार आहे. यावेळी लंडन विधानसभेच्या निवडणुकाही पार पडणार आहेत. सध्या लेबर पार्टीच्या सादिक खान यांच्या खांद्यावर महापौरपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते 2016 पासून महापौरपदी विराजमान आहेत. याशिवाय, माँटीने पुन्हा क्रिकेट खेळण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. मॉन्टी पानेसारने इंग्लंडसाठी 50 कसोटी सामन्यांमध्ये 167 विकेट्स घेतल्या आहेत. तर 26 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावे 24 विकेट्स आहेतत. 2006 मध्ये नागपूर येथे झालेल्या भारतविरुद्ध कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.