माईक हसी (Photo Credit: Getty)

ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज माईक हसीने (Mike Hussey) टीम इंडियाचा (Indian Team) वर्ल्ड कप विजेता कर्णधार एमएस धोनीचे (MS Dhoni) कौतुक करत म्हटले आहे की, अनुभवी भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज क्रिकेटमध्ये आजवर पाहिला गेलेला “महानतम फिनिशर” आहे. धोनीने त्याच्या नेतृत्वात भारताने (India) 2007 टी-20 विश्वचषक, 2011 एकदिवसीय वर्ल्ड कप आणि 2013 चा चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद जिंकले आहे. पदार्पणापासून त्याने सतत स्वत:च्या खेळात सुधार केले आहे आणि 16 वर्षांपासून भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तो जागतिक क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हणून ओळखला जातो आणि आता ही वस्तुस्थिती ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू हसीनेही मान्य केली आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या व्हिडिओकास्टमध्ये संजय मांजरेकरांशी बोलताना हसी म्हणाला, “धोनी हा आतापर्यंतचा महान फिनिशर आहे, ज्याने कधी क्रिकेट जग निर्माण केले.” (IPL 2020 रद्द झाल्यास एमएस धोनीच्या पुनरागमनावर गौतम गंभीरने केली भविष्यवाणी, Replacement साठी 'या' विकेटकीपर-फलंदाजाचे केले समर्थन)

“कर्णधार धोनी स्वत:ला शांत ठेवू शकतो. धोनीकडे अतुलनीय शक्ती आहे. त्याला हे ठाऊक आहे की जेव्हा दोऱ्या साफ करणे आवश्यक आहे, तेव्हा तो तसे करू शकतो. त्याच्याकडे असा आत्मविश्वास आहे. क्रिकेटच्या इतिहासात तो निश्चितच एक उत्तम फिनिशर आहे.” धोनीसंदर्भात हसीने पुढे आपल्या निवेदनात म्हणाले की, “ते लवकर हार मानत नाहीत. आपल्या विचारात अडथळा आणत नाही. नेहमी सातत्याने फलंदाजी करतो. पुढाकार घेऊन संघाचे नेतृत्व करतो. जर कोणताही कर्णधार पुढाकाराने संघाचे नेतृत्व करतो तर त्याच्या संघाचा बराच फायदा होतो. मग तो धोनी असो वा रिकी पाँटिंग.”

धोनी सीएसकेचे 13 व्या आयपीएलमध्ये नेतृत्व करणार होता, जो कोरोनो व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. 29 मार्चपासून आयपीएलची सुरुवात होणार होती, पण भारतात कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे टूर्नामेंट 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली. आणि आता या स्पर्धाचे भविष्य काय असेल यावर सर्वांचे लक्ष लागून आहे. धोनी आणि हसी यापूर्वी चेन्नई टीमसाठी एकत्र खेळले आहेत.