Video Of Super Duper Catch In Cricket: राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीक क्रिकेट (Cricket) सामन्यांमध्ये खेळाडूंनी काढलेल्या विकेट्स, घेतलेले झेल आणि केलेल धावबाद, यष्टीरक्षण नेहमीच अनेकदा कौतुकाचे विषय ठरतात. नानाविध तंत्रज्ञानांनी युक्त कँमेऱ्यांनी टीपलेले हे क्षण अधिक उठावदार दिसतात. पण स्थानिक पातळीवरही टॅलेंटची मुळीच कमी नसते. अशाच एका स्थानिक पातळीवर खेळल्या गेलेल्या क्रिकेटच्या सामन्यात चक्क फुटबॉल स्टाईल (Football Style Cricket) थरार पाहायला मिळाल. एका खेळाडूने सीमारेशेच्या बाहेरुन चक्क लाथ मारुन झेल पकडला. होय, खरेतर हा क्षण शब्दात बांधणे काहीसे कठीण आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओच (Viral Videos Of Cricket) पाहावा लागेल. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही. परंतू, क्रिकेटच्या मैदानावरील आजवरच्या काही दुर्मिळ झेलपैकी हा एक झेल ठरेल हे नक्की. (हेही वाचा, Liam Livingstone Catch Video: लियाम लिव्हिंगस्टोने कुसल मेंडिसचा घेतला पळत जबरदस्त झेल, पहा व्हिडीओ)
काय घडले नेमके?
घडले नेमके असे, मैदानावर सामना सुरु. गोलंदाजाने गोलंदाजीसाठी धावणे सुरु केले. आपल्या नेहमीच्या शैलीत त्याने चेंडू फलंदाजाकडे फेकला. फलंदाजानेही मग चेंडूचा अंदाज घेत आपल्या खास शैलीतच तो फटकावला. चेंडूचा अंदाज आल्याने फलंदाजाने चेडूं थेट सीमारेषेच्या बाहेर जाईल अशा बेताने फटकावला. पण, तो सीमारेपलीकडे जाणार इतक्यात तिथे क्षेत्र रक्षणासाठी उभ्या असलेल्या खेलाडूने तो चेंडू हवेतच पकडला. हा झेल ठरणार इतक्यात त्याचा तोल गेला. त्याने तो सावरत कसाबसा सीमारेषेतच पकडण्याच प्रयत्न केला. पण त्यात तो यशस्वी झाला नाही. त्याचा तोल जाऊ लागला. क्षणाचाही विलंब न लावता श्वास रोखत त्याने तो चेंडू हवेत भिरकावला. पण, दुर्दैव असे की, चेंडू सिमारेषेबाहेर आला. आता क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू आणि चेंडू दोन्ही सीमारेशेबाहेर. फरक इतकाच की, खेळाडू जमीनावर आणि चेंडू हवेत. पठ्ठाने क्षणाचाही विलंब लावला नाही. थेट फुटबॉलपटू प्रमाणे थेट हवेत ऊडी घेऊन चंडूला लाथ मारली (किक मारली) चेंडू थेट सीमारेशेत. लगेचच सोबतच्या खेळाडूने ही सधी साधत झेलपकडला.
व्हिडिओ
This is what happens when you bring a guy who also knows how to play football!! ⚽️ 🏏 😂 https://t.co/IaDb5EBUOg
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 12, 2023
डोळ्याचे पारणे फिटावे असा अत्यंत सुंदर झेल क्रिकेटप्रेमी आणि क्रीडा रसिकांच्या नेहमी स्मरणात राहील. हा व्हिडिओ सचिन तेंडुलकर, जिमी नीशम आणि मायकेल वॉन यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय आणि माजी क्रिकेटपटू ट्विटरवर शेअर केला आहे.