IND vs AUS, 2nd T20I Live Streaming Online: टीम इंडियासाठी आजची लढाई करो किंवा मरो, सामना कधी आणि कुठे पाहाल?
IND vs AUS (Photo Credit - Twitter)

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (IND vs AUS) तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिला सामना 4 गडी राखून गमावला. अशा परिस्थितीत आता नागपुरात (Nagpur) होणारा दुसरा सामना टीम इंडियासाठी (Team India) करो किंवा मरो असा सामना आहे. भारतीय संघ कोणत्याही किंमतीला येथे विजयाची नोंद करू इच्छितो. येथे संघ हरला तर मालिका गमवावी लागेल. दोन्ही संघांमध्ये जवळपास दोन वर्षांनंतर द्विपक्षीय टी-20 मालिका खेळवली जात आहे. भारताने शेवटचे ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले होते, तर 2019-20 मध्ये त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. (हे देखील वाचा: IND vs AUS T20 2022: भारत आणि ऑस्ट्रेलिया T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पावसाची शक्यता, जाणून घ्या तेथील हवामानाची स्थिती)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा T20 कधी आणि कुठे खेळवला जाणार आहे?

दोन्ही संघांमधील दुसरा टी-20 सामना शुक्रवारी (23 सप्टेंबर) होणार आहे. हा सामना नागपुरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

सामना किती वाजता सुरू होईल?

भारतीय वेळेनुसार या सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी 6.30 वाजता होईल आणि सामना 7 वाजता सुरु होईल.

सामना कोणत्या चॅनलवर पाहता येईल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या मालिकेचे प्रसारण हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. अशा परिस्थितीत स्टार स्पोर्ट्सच्या विविध वाहिन्यांवर सर्व सामने वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येतील.

तुम्ही या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकतात?

या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही डिस्ने+हॉटस्टारवर पाहू शकतात.