England Women National Cricket Team vs Scotland Women National Cricket Team 17th Match 2024 ICC Womens T20 World Cup Scorecard: 2024 आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाचा 17 वा सामना आज म्हणजेच 13 ऑक्टोबर रोजी इंग्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध स्कॉटलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात इंग्लंड संघाने स्कॉटलंडचा दहा गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह इंग्लंडने उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. दुसरीकडे, स्कॉटिश संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
England dominate Scotland to make it three wins from three!https://t.co/uvySKrI0ow | #T20WorldCup pic.twitter.com/JigDL18yBL
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 13, 2024
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या स्कॉटिश संघाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी केली. स्कॉटलंड संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 109 धावा केल्या. स्कॉटलंडसाठी कर्णधार कॅथरीन ब्राइसने 33 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. कॅथरीन ब्राइसशिवाय सारा ब्राइसने 27 धावा केल्या. (हे देखील वाचा: 2024 ICC Women’s T20 World Cup Points Table Update: बांगलादेशवर 7 गडी राखून पराभव करत दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत दाखल; टी 20 विश्वचषकातील गुण तालिका पहा)
नॅट सायव्हर-ब्रंटने इंग्लंड संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. इंग्लंडकडून सोफी एक्लेस्टोनने सर्वाधिक दोन बळी घेतले. सोफी एक्लेस्टोनशिवाय नॅट सायव्हर-ब्रंट, लॉरेन बेल, शार्लोट डीन आणि डॅनियल गिब्सन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंड संघाला 20 षटकात 110 धावा करायच्या होत्या.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली आणि पहिल्या विकेटसाठी दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी तुफानी फलंदाजी करत अवघ्या 60 चेंडूत 113 धावा केल्या. इंग्लंड संघाने एकही विकेट न गमावता अवघ्या 10 षटकांत लक्ष्य गाठले. इंग्लंडकडून माईया बाउचियरने सर्वाधिक नाबाद 62 धावांची खेळी खेळली. या झंझावाती खेळीदरम्यान मैया बाउचियरने 34 चेंडूत 12 चौकार मारले. माय्या बाउचियरशिवाय डॅनियल व्याट-हॉजने नाबाद 51 धावा केल्या.