आयसीसी क्रिकेट विश्वचषक आता आपल्या अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. इंग्लंडच्या प्रतिष्ठित लॉर्ड्स च्या मैदानावर न्यूझीलंड आणि यजमान इंग्लंड संघात फायनलचा ठरत रंगणार आहे. विश्वचषकच्या अंतिम सामन्यात टॉस जिंकून कर्णधार केन विल्यमसन याने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. फायनल सामन्यासाठी दोन्ही संघाच्या प्लेयिंग एलेव्हनमध्ये कोणताही बदल नाही करण्यात आला आहे.  (ICC World Cup 2019: विश्वचषकमधून बाहेर पडल्यानंतर नवीन 'Mauka-Mauka' ऍडद्वारे टीम इंडियाला मानवंदना, पहा Video)

सेमीफायनलमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत भारतीय क्रिकेट संघावर मात करणारा न्यूझीलंड संघ आणि ऑस्ट्रेलियावर मात करणाऱ्या इंग्लंडच्या संघाचा आत्मविश्वास पाहता आता या सामन्यात कोणाचं पारडं जड असणार हे पाहणंही महत्त्वाचे ठरणार आहे. न्यूझीलंड संघाला आतापर्यंत एकदाही विश्वचषकाला गवसणी घालता आलेली नाही. मात्र या संघानं नेहमीच अपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी केली. दुसरीकडे, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघांनी आतापर्यंत विश्वचषक जिंकलेला नाही. त्यामुळे जो संघ जिंकेल तो इतिहास घडवेल यात शंका नाही.

याआधी झालेल्या 11 विश्वचषकाचे विजेतेपद 5 देशांनी मिळवले आहे. त्यापैकी ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 5 वेळा भारत आणि वेस्ट इंडिज यांनी प्रत्येकी दोन वेळा. तर श्रीलंका आणि पाकिस्तान यांनी प्रत्येकी एक वेळा विजेतेपद मिळवले आहे.