
पाकिस्तानचा (Pakistan) माजी कर्णधार इंझमाम-उल-हक (Inzamam-ul Haq) यांनी गेल्या आठवड्यात इंग्लंडविरुद्ध (England) दुसऱ्या टी-20 सामन्यात क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक आणि निवडकर्ते मिसबाह-उल-हक (Misbah-ul Haq) यांना निराशाजनक प्रदर्शनानंतर फटकार लागावली. पाकिस्तानने पहिले फलंदाजीला केल्यानंतर यजमान इंग्लंडसमोर विजयासाठी 195 धावांचे लक्ष्य ठेवले. परंतु इयन मॉर्गनच्या (Eoin Morgan) सनसनाटी डावामुळे इंग्लंडने पाच विकेट्स राखून ठेवलेल्या लक्ष्य गाठले. त्याच्या लेटेस्ट यूट्यूब व्हिडीओवर बोलताना इंझमामने सामन्यादरम्यान मिसबाहने दाखवलेल्या नकारात्मक प्रतिक्रिरेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले की त्याच्या अशा वागण्यामुळे एखाद्या स्पर्धेच्या वेळी संघाच्या मनोवृत्तीवर परिणाम होईल. “इंग्लंडच्या डावाच्या पाचव्या षटकात, जेव्हा पाकिस्तान आपले पॉवरप्ले ओव्हर्समध्ये गोलंदाजी करीत होता आणि 40-45 धावा देत होता, तेव्हा कॅमेरा मिसबाह दाखवत होता आणि त्याच्या डोक्यावर हात होता, ज्यावरून असे सूचित होते की खरोखर काहीतरी वाईट घडले आहे.” (ENG vs PAK 3rd T20: इंग्लंड दौऱ्यावर पाकिस्तानचा एकमेव विजय; मोहम्मद हाफिज, हैदर अलीच्या खेळीने अंतिम टी-20 सामन्यात 5 धावांनी विजयासह मालिका 1-1 ने ड्रॉ)
“अजून 155-160 धावा बाकी आहेत, सामना कोणाच्याही बाजूने जाऊ शकतो, परंतु आपण एखादा संदेश पाठवत आहात जे सूचित करते की आपण काहीतरी चूक केली आहे.खेळानंतर तुमची योग्य चर्चा होऊ शकते, परंतु सामन्यादरम्यान अशी प्रतिक्रिया दिल्यास त्याचा संघावर वाईट परिणाम होईल,” इंझमाम पुढे म्हणाले. “सामन्यादरम्यान काय झाले याची पर्वा नसली तरी ड्रेसिंग रूममधून फक्त सकारात्मक व्हायबस बाहेर पडायला हवेत. हे खूप महत्वाचे आहे. आपण टी-20 चॅम्पियन आहोत. आम्ही जर त्या (फॉर्मेट) मध्ये हरत असाल तर ते चिंतेचे कारण आहे,” पाकिस्तानचे माजी कर्णधार म्हणाले.
गेल्या वर्षी आयसीसी वर्ल्ड कपनंतर काढून टाकण्यात आलेल्या माजी प्रशिक्षक मिकी आर्थरआणि मिसबाह यांच्यातही इंझमामने तुलना केली. जेव्हा आर्थरने मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले तेव्हा मुख्य निवडक असलेले इंझमाम म्हणाले, “मिकी आर्थर तशाच प्रकारे प्रतिसाद देत असायचे.” यापूर्वी पाकिस्तानने तीन कसोटी सामन्यांची मालिका 1-0 ने गमावली, पण अखेरच्या टी-20 सामन्यात पाकिस्तानने 5 धावांनी विजय मिळवला आणि मालिका 1-1 ने अनिर्णित राहिली. इंग्लंड दौऱ्यावरील पाकिस्तानी टीमचा हा एकमेव विजय ठरला.