ENG vs PAK 2nd T20I: इंग्लंडच्या Liam Livingstone ने पाकिस्तानविरुद्ध खेचला आतापर्यंतचे सर्वात मोठा षटकार? तुम्हीच पाहा आणि ठरवा (Watch Video)
लियाम लिव्हिंगस्टोन (Photo Credit: Twitter)

ENG vs PAK 2nd T20I: इंग्लंड (England) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या सलामीच्या सामन्यात ब्रिटिश फलंदाज लियाम लिविंगस्टोनने (Liam Livingstone) पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. पण ते व्यर्थ ठरले आणि शुक्रवारी (16 जुलै रोजी) नॉटिंघॅमच्या ट्रेंट ब्रिज (Trent Bridge) येथे बाबर आजमच्या नेतृत्वातील संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. रविवारी (18 जुलै) दुसऱ्या टी-20 सामन्यात लिव्हिंगस्टोनने 165.22 च्या सरासरीने 23 चेंडूत 38 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारताना 2 चौकार आणि 3 षटकार खेचले. यादरम्यान त्याने इंग्लंडच्या डावात सर्वाधिक षटकार ठोकला. जोस बटलर अँड कंपनीला प्रथम फलंदाजी करण्यास सांगण्यात आल्यानंतर लिव्हिंगस्टोनने हॅरीस रऊफच्या (Harris Rauf) 6 व्या षटकातील पहिला चेंडूवर लॉन्ग-ऑनवर छतावर उत्तुंग षटकार खेचला. (Babar Azam World Record: बाबर आजम याचा हाशिम आमला, विराट कोहली यांना धक्का, एका शतकी खेळीने केले 5 कमाल)

लिव्हिंगस्टोनचे मारलेला षटकार इतका मोठा होता की त्याने टीव्हीवर कमेंटरी करणाऱ्यांना देखील शॉक दिला. राऊफने टाकलेल्या चेंडूबद्दल बोलायचे तर उजव्या हाताच्या फलंदाजाच्या दृष्टीने तो फुल आणि बरोबर होता पण लिविंगस्टोनने क्लीन बॅट स्विंगने चेंडू मोठ्या षटकारासाठी हवेत खेचला जे पाहून स्टेडियमवरील प्रेक्षक आणि टीव्हीवर सामना पाहणारे चाहते देखील थक्क झाले. लिविंगस्टोनच्या षटकाराचा व्हिडिओ इथे पाहा...

सामन्याबद्दल बोलायचे तर बटलरच्या 39 चेंडूत 59 धावा आणि मोईन अली व लिव्हिंगस्टोनच्या वेगवान खेळीमुळे 19.5 ओव्हरमध्ये 200 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात मोहम्मद रिझवान, शादाब खान, बाबर, इमाद वसीमसारख्या मेन इन ग्रीन फलंदाजांना सुरुवात झाली पण कोणीही दीर्घकाळ टिकू शकला नाही. साकीब महमूदच्या 3 विकेट्स आणि मोईन व आदिल रशीदच्या 2 विकेट्सपुढे पाकिस्तान 20 ओव्हरमध्ये 155/9 धावाच करू शकला आणि इंग्लंडने सामना जिंकत मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. मंगळवार, 20 जुलै रोजी अंतिम टी-20 आंतरराष्ट्रीय सामना मॅचचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळला जाणार आहे.