पाकिस्तान क्रिकेट संघाचा (Pakistan Cricket Team) अंडर-19 फलंदाज हैदर अलीला (Haider Ali) इंग्लंड (England) दौर्यासाठी पाकिस्तानच्या 29-सदस्यीय संघात स्थान मिळाले आहे. यंदा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाकिस्तान इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन्ही टीममध्ये 3 सामन्यांची टेस्ट आणि टी-20 मालिका खेळली जाईल. हैदरने 2019-20 च्या हंगामात चमकदार कामगिरी बजावली, यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला 2020-21 च्या हंगामासाठी इमर्जिंग प्लेअर म्हणून करारबद्ध केले गेले. अंडर-19 गटात तो पाकिस्तानचा दुसरा यशस्वी फलंदाज होता. गतवर्षी जूनमध्ये हैदरने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 317 धावा केल्या, त्यानंतर एसीसी इमर्जिंग संघ कपमध्ये 218 धावा केल्या. कैद-ए-आजम ट्रॉफीमध्ये हैदरने 645 धावा केल्या. मात्र अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये त्याला प्रभावी काम करता आले नाही आणि पूर्ण स्पर्धेत फक्त 107 धावा केल्या. नंतर पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) हैदरने पेशावर झल्मीकडून 158 च्या स्ट्राईक रेटने 239 धावा केल्या. (शोएब अख्तरने भारत-पाकिस्तान वनडे क्रिकेटमधील 10 सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंची केली निवड; विराट कोहली-रोहित शर्मा Out)
हैदर व्यतिरिक्त काशिफ भट्टी हा एक अनकॅप्ड क्रिकेटर असून त्यालाही संघात स्थान देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकाविरुद्ध कसोटी संघात काशिफची निवड झाली, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. बिलाल असिफ, इम्रान बट्ट, मूसा खान आणि मोहम्मद नवाज यांची कव्हर खेळाडू म्हणून संघात निवड झाली आहे. पाकिस्तान क्रिकेटपटूंची कोविड-19 चाचणी 20 ते 25 जून दरम्यान घेतली जाईल आणि सर्व काही ठिव राहिल्यास या कव्हर खेळाडूंना संघात स्थान मिळू शकेल. हसन अली, मोहम्मद आमिर आणि हैरिस सोहेल यांनी आधीच निवड प्रक्रियेसाठी उपलब्ध नसल्याचे सांगितले होते.
पाकिस्तानचा 29-सदस्य संघ: आबिद अली, फखर जमान, इमाम उल हक, शान मसूद, अजहर अली (कॅप्टन, टेस्ट), बाबर आजम (टेस्ट उपकर्णधार, टी-20 कॅप्टन), असद शफीक, फवाद आलम, हैदर अली, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सरफराज अहमद (विकेटकीपर), फहीम अशरफ, हैरिस राउफ, इमरान खान, मोहम्मद अब्बास, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, सोहैल खान, उस्मान शिनवरी, वहाब रियाज, इमाद वसीम, काशिफ भट्टी, शादाब खान आणि यासिर शाह.