जोफ्रा आर्चर (Photo by Clive Mason/Getty Images)

दोन आठवडे आधी क्रिकेट विश्वचषक जिंकणारा इंग्लंड (England) संघ आयर्लंड (Ireland) संघाविरुद्ध पहिल्यांदा मैदानावर उतरला. आणि आपल्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडने आयर्लंडसमोर अक्षरशः गुडघे टेकले. इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील एकमेव चारदिवसीय कसोटी सामन्याला लॉर्ड्स (Lords) वर दोन दिवसाआधी सुरुवात झाली. इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, आयर्लंडच्या गोलंदाजांनी यजमानांची अवस्था बिकट केली. वयाच्या 38व्या वर्षी तिसराच टेस्ट सामना खेळणाऱ्या टीम मुर्ताघने इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत पाठवला. आणि पहिल्या दिवसा अखेरीस इंग्लंडचा संपूर्ण संघ 23.4 षटकांत 85 धावांत तंबूत परतला. (Global T-20 League: खराब 'पंचगिरी' मुळे युवराज सिंह बाद, ट्विटरवर यूजर्स ने व्यक्त केला संताप)

इंग्लंड आणि आयर्लंड संघातील या सामन्यामध्ये इंग्लंच्या विश्वचषकचा नायक, जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याचा एक ट्विट वायरल झाला. आणि त्यानंतर काही दिवस त्याची इंटरनेटवर चर्चा सुरु होती. आणि आता त्याला या ट्विटवरून ट्रोल करण्यात येत आहे. आर्चर याने तो ट्विट जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्या संदर्भात केला होता. विश्वचषक दरम्यान आर्चर याचे ट्विट्स चर्चेचा विषय बनले होते. आर्चरने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिले, "गोलंदाजांसाठी अनुकूल परिस्थिती पाहण्याची माझी इच्छा आहे, अँडरसन आणि ब्रॉडला थांबवणे कठीण जाईल." आर्चरने हे ट्विट तेव्हा केले होते जेव्हा संपूर्ण इंग्लंड संघ 85 धावांवर बाद झाला होता. आर्चरला या ट्विटसाठी ट्रोल केले जात आहे कारण त्याने यात अँडरसनचा उल्लेख केला होता. आणि अँडरसन आयर्लंडविरुद्ध खेळातच नाही आहे. काही यूजर्सने लिहिले की अर्चरला माहीतच नाही इंग्लंडच्या संघात कोण खेळात आहे आणि कोण नाही. तर काही म्हणाले की हे ट्विट भविष्यातील सामन्यासाठी आहे.

हे ट्विट भविष्यासाठी आहे

तू एक जादूगार आहे

मला वाटले की हे जुने ट्विट आहे

जिमी खेळत नाहीये भावा

इतकेच नाही तर आयर्लंड क्रिकेटने देखील आर्चरला ट्रोल केले. आयर्लंड क्रिकेटने ट्विट करत लिहिले की, "इंग्लंडचा जो खेळाडू पुढील आठवड्यात अॅशेस मालिका खेळणार आहे त्याला हे माहितीच नाही की त्याच्या संघाच्या सध्याच्या सामन्यात काय होत आहे, तो झोपला आहे का?"

दरम्यान, इंग्लंडने आपल्या दुसऱ्या इंनिंगमध्ये उत्कृष्ट कमबॅक केले. पण आयर्लंडच्या गोलंदाजांनी पुन्हा त्यांच्या गोलंदाजीने यजमान देशाच्या नाकी-नऊ आणले. तिसऱ्या दिवशी इंग्लंडने आयर्लंडसमोर जिंकण्यासाठी 182 धावांचे लक्ष्य दिले आहे.