(Photo Credit: Wikimedia Commons, PTI, Getty Images)

भारताची राजधानी दिल्लीचे प्रसिद्ध फिरोजशाह कोटला स्टेडियम (Feroz Shah Kotla) चे नाव बदलून आत अरुण जेटली (Arun Jaitley) स्टेडियम करण्यात आले आहेत. फिरोजशाह कोटला स्टेडियमचे अधिकृत नाव अरुण जेटली स्टेडियम ठेवण्यात आले. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी अनावरण केले. यानिमित्ताने संपूर्ण भारतीय क्रिकेट संघ कोटला स्टेडियममध्ये उपस्थित होता. याशिवाय, डीडीसीएने (DDCA) पुढाकार घेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्या नावावर स्टॅन्डचे अनावरण देखील केले. कोहलीनंतर स्टॅन्डचे नाव करण्याचा कार्यक्रम जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या वेटलिफ्टिंग हॉलमध्ये झाला. गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू आणि अरुण जेटली यांचे कुटुंबीयही या कार्यक्रमात सहभागी होते. याशिवाय विराटची पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री उपस्थित होते. दिवंगत अरुण जेटली यांच्या नावाने या स्टेडियमचे नाव झाल्यावर या स्टेडियममधील पहिला आंतरराष्ट्रीय सामना बांगलादेशविरूद्ध होणार आहे.

या कार्यक्रमादरम्यान शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, खलील अहमद, मनीष पांडे, रवींद्र जडेजा यांच्यासह अनेक खेळाडू उपस्थित होते. दिवंगत भाजप नेते जेटली, 14 वर्षे डीडीसीएचे अध्यक्ष होते. आपल्या कारकिर्दीत जेटलीनी अनेक खेळाडूंना आपल्या परीने सहाय्य केले होते. कोहलीच्या नावावर स्टॅन्ड करण्याबाबत बोलताना रजत शर्मा बोलले, "जेव्हा मी विराटच्या सन्मानार्थ स्टॅन्डला त्याचे नाव देण्याचे ठरविले तेव्हा मी अरुण जेटली जी यांना हे प्रथम सांगितले. त्यांनी मला सांगितले की हा एक चांगला निर्णय आहे कारण जागतिक क्रिकेटमध्ये विराटपेक्षा चांगला खेळाडू नाही."

डीडीसीएचे अध्यक्ष रजत शर्मा म्हणाले, "आम्ही अशी व्यवस्था करू की ज्याने गरीब मुलांना विनामूल्य क्रिकेट शिकवले जाईल." ते म्हणाले की, वीरेंद्र सेहवाग, आशिष नेहरा सारखे खेळाडू आहेत जे एका पैशाचा खर्च न करता दिल्लीचे क्रिकेट बदलण्यास मदत करतील."