केन विल्यमसन रनआऊट (Photo Credit: Twitter/Leeds_174)

सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात केन विल्यमसन (Kane Williamson), ज्याच्या चेहऱ्यावर प्रत्येकाने फक्त हसू पहिले, तो आजच्या सामन्यात वैतागलेला दिसला. चेन्नई सुपर किंगविरुद्ध फलंदाजी करताना केन धावबाद झाला ज्याची निराशा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर बाद झाल्यावर टीमच्या मोठा स्कोर करण्याच्या आशा मंदावल्या असताना खेळपट्टीवर केन आणि युवा फलंदाज प्रियम गर्ग (Priyam Garg) यांच्यात गैरसमज झाला परिणामी विल्यमसनला आपली विकेट लागली. विल्यमसनच्या प्रकारे बाद झाला आणि त्यानंतर त्याची प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय बनली आहे. आजच्या सामन्यात प्रियम गर्गने 51 धावा केल्या. अर्धशतकी खेळीत त्याने 4 चौकार आणि एक षटकार लगावला. (CSK vs SRH, IPL 2020: 19 वर्षीय प्रियम गर्गने ठोकले पहिले आयपीएल अर्धशतक! हैदराबादने CSK ला दिला 165 धावांचे आव्हान)

विल्यमसनने गर्गकडे निराशेने पाहिले जे नेहमी पहिले जात नाही. विल्यमसन आपल्या शांत वागण्यामुळे प्रसिध्द आहे. 2019 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभवानंतरही त्याच्या चेहऱ्यावर हसू दिसत होते. म्हणूनच, त्याच्या संतप्त प्रतिक्रियाने ट्विटरवर तुफान ओढवून घेतले आणि चाहत्यांनी हास्यास्पद मिम्सने प्रतिक्रिया व्यक्त केली. ही घटना 11व्या ओव्हर दरम्यान घडली. दरम्यान, नेटीझन्सने विल्यमसनच्या विकेटवेळ कशी प्रतिक्रिया दिली ते पाहूया:

पाहा व्हिडिओ:

न पाहिलेले दृश्य !!

तुलना !!

नक्कीच दुर्मिळ !!

विल्यम्सनच्या धावबादमध्ये मोठा वाटा उचलल्यानंतर प्रियमवर दबाव आला होता. दरम्यान, विलियमसन 9 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतल्यावर हैदराबादची स्थिती 69/4 अशी झाली होती. टीम मोठ्या स्कोअरपर्यंत पोहचू शकणार नाही असं दिसत होतं. पण, गर्ग आणि अभिषेक शर्मा यांच्यातील 77 धावांच्या भागीदारीने टीमला सन्मानजनक स्कोअरपर्यंत पोहोचवलं. शेवटच्या 9 ओव्हर प्रियमने 23 चेंडूत अर्धशतक झळकावताना टीमसाठी 95 धावा जमवल्या. चेन्नईकडून सॅम कुरन आणि शार्दुल ठाकूर यांना 1 विकेट मिळाली, तर दीपक चाहरने 2 गडी बाद केले.