CSK vs RCB, IPL 2020: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात आयपीएलचा (IPL) 25वा सामना सध्या दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. आजच्या सामन्यात आरसीबी कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. अशा स्थितीत विराट सेनेने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 169 धावा करत सीएसकेसमोर (CSK(+) विजयासाठी 170 धावांच तंगड आव्हान ठेवले. सीएसके गोलंदाजांनी आरसीबीच्या धडाकेबाज फलंदाजांसमोर आक्रामक गोलंदाजी केली आणि टीममधील मोठ्या खेळाडूंना स्वस्तात माघारी परतले. आरसीबीकडून (RCB) विराटने अर्धशतक ठोकले आणि नाबाद 90 धावा केल्या. देवदत्त पडिक्कलने 33 आणि वॉशिंग्टन सुंदरने 10 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, सीएसकेसाठी शार्दूल ठाकूरने 2, दीपक चाहर आणि सॅम कुरनला प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (CSK vs RCB, IPL 2020: विंटेज एमएस धोनी! CSK कर्णधाराच्या नवीन हेअर स्टाईलवर चाहते फिदा, पाहा प्रतिक्रिया)
आरोन फिंच, एबी डिव्हिलिअर्स सारखे तडाखेबाज फलंदाज माघारी परतल्यावर कर्णधार कोहलीने आरसीबीकडून एकटी झुंज दिली आणि टीमला धावसंख्येपर्यंत केले. विराटने 39 चेंडूत चौकार मारत आयपीएल मधील यंदाचे दुसरे अर्धशतक ठोकले. नाणेफेक जिंकून फलंदाजी करणाऱ्या आरसीबीला अवघ्या 13 धावांवर पहिला धक्का बसला. दीपक चाहरने 9 चेंडूत 2 धावा करून खेळणाऱ्या फिंचची क्लीन बोल्ड केले. यानंतर कर्णधार कोहली आणि देवदत्त यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. मात्र पडिककल 34 चेंडूंत 33 धावांवर बाद झाला. डिव्हिलियर्स भोपळाही फोडू शकला नाही आणि शार्दूल ठाकूरने त्याला विकेटच्या मागे धोनीकडे झेलबाद केले. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरला सॅम कुरनने 10 धावांवर कॅच आऊट केले. टीमने अवघ्या 93 धावांवर 4 विकेट गमावल्या. यानंतर विराटने सलग दुसरे अर्धशतक ठोकले आणि मोठे फटके मारण्यास सुरुवात केली. या दरम्यान जडेजाने बाउंड्री लाईनवर विराटचे दोन कॅच सोडले ज्याचा फटका सीएसकेला बसला. शिवम दुबे नाबाद 22 धावा करून परतला.
या सामन्यासाठी आरसीबी संघात दोन बदल करण्यात आले आहेत. क्रिस मॉरिसला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्यात आले आहे, तर गुरकीरत मानलाही संधी मिळाली आहे. दुसरीकडे, चेन्नई संघात एक बदल झाला आहे. केदार जाधवला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर काढले असून जगदीशनला संधी देण्यात आली आहे.