रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

CSK vs MI, IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 13मध्ये आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स संघ (Chennai Super Kings) आमने-सामने आले आहेत. मात्र, या सामन्याला मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे मुकावे लागले आहे आणि त्याच्याऐवजी किरोन पोलार्ड (Kieron Pollard) मुंबई इंडियन्सचे प्रभारी नेतृत्व करत आहे. सीएसकेविरुद्ध सामना सुरू होण्याआधीच 33 वर्षीय रोहितच्या खेळण्याबाबत आधीच शंका होती आणि नाणेफेक दरम्यान पोलार्ड मैदानात आल्याने रोहित आजच्या सामन्याला मुकणार असल्याची पुष्टी झाली. विशेष म्हणजे हा फक्त दुसराच प्रसंग आहे की रोहित हा एमआयच्या (MI) इलेव्हनमध्ये सामील नाही. आयपीएल (IPL) 2019 मध्ये, त्याच्या उजव्या पायाच्या हॅमस्ट्रिंगमुळे किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध लीग टप्प्यातील सामन्याला मुकावे लागले होते. 2011मध्ये मुंबई इंडियन्समध्ये दाखल झालेल्या रोहितने फ्रँचायझीसाठी पहिला सामना गमावण्यापूर्वी सलग 133 सामने खेळले. (CSK vs MI, IPL 2020: मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; दोन्ही संघांनी Playing XIमध्ये केले मोठे बदल)

रोहितच्य जागी तेव्हाही पोलार्डने मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले होते. रोहित आयपीएल कारकिर्दीतील त्याच्या तिच्या तिसऱ्या सामन्याला मुकला आहे. यापूर्वी 2008च्या आवृत्तीत डेक्कन चार्जर्सने अंतिम लीग सामन्यासाठी विश्रांती दिली होती. दरम्यान, किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध सामन्यादरम्यान रोहित ताण सहन करावा लागला होता. दुसर्‍या सुपर ओव्हरमध्ये त्याला फलंदाजीची परवानगी देण्यात आली होती परंतु तो फलंदाजीसाठी मैदानावर आला नाही. सामन्यानंतर पोलार्डने रोहित अस्वस्थ असल्याचे उघड केले होते. फ्रँचायझीच्या विधानानुसार, त्यांना सीएसकेविरुद्ध सामन्यासाठी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आयपीएलमध्ये एकही सामन्याला न चुकत सर्वाधिक सामानाने खेळण्याचा विक्रम चेन्नई सुपर किंग्सच्या सुरेश रैनाच्या नावावर आहे. रैनाने 2008-2018 दरम्यान सलग 134 आयपीएल सामने खेळले आहेत.

दुसरीकडे, आजच्या सामन्यात रोहितच्या जागी सौरभ तिवारीला संधी देण्यात आली आहे. पोलार्डने टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने जिथे त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकच बदल केला आहे, दुसरीकडे, सीएसकेच्या अंतिम-11 मध्ये तीन बदल झाले आहेत. शेन वॉट्सन, पियुष चावला आणि केदार जाधव यांच्या जागी इमरान ताहीर, एन जगदीशन आणि रुतुराज गायकवाड यांना संधी मिळाली आहे.