CSK vs MI, IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगचे (Indian Premier League) दोन यशस्वी संघ, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात आयपीएलचा (IPL) आज महामुकाबला खेळला जाणार आहे. आजच्या सामन्याला मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे मुकावे लागत आहे. रोहितच्या जागी कीरोन पोलार्ड (Kieron Pollard) मुंबईचे आज नेतृत्व करत आहे. आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार कीरोन पोलार्डने टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई आणि मुंबई यांच्यातील आजचा सामना शारजाह येथे खेळला जात आहे. ‘करा किंवा मरा’च्या सामन्यात एमआय आणि सीएसके (CSK) प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल पाहायला मिळत आहे. आजच्या सामन्यासाठी सीएसकेने त्यांच्या युवा खेळाडूंना संधी दिली आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध आजचा सामना सीएसकेचा 200वा आयपीएल सामना आहे. (IPL 2020: CSKविरुद्ध लढाईपूर्वी मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्माने दिले 'बॅलेन्स द बॅट चॅलेंज', पाहा Video)
एमआय प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल झाला आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा सामन्यातून बाहेर असल्याने मुंबईसाठी क्विंटन डी कॉकसह सौरभ तिवारी सलामीला येईल. मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, ईशान किशन आणि हार्दिक पांड्या असतील. अखेरीस वेगाने धावा करण्याची जबाबदारी किरोन पोलार्डवर असेल. गोलंदाजीत मुंबईने शानदार कामगिरी बजावली आहे. ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, जेम्स पॅटिन्सन पुन्हा एकदा सीएसकेविरुद्ध वेगवान हल्ला करण्यासाठी सज्ज असतील. राहुल चाहर आणि कृणाल पांड्या फिरकी विभाग सांभाळतील. दुसरीकडे, सीएसकेने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत. शेन वॉट्सन, केदार जाधव आणि पियुष चावला यांना बाहेर केले असून त्यांच्या जागी इमरान ताहीर, एन जगदीशन आणि रुतुराज गायकवाड यांना संधी मिळाली आहे. सॅम कुरन आणि फाफ डु प्लेसिस सलामीला येतील. मधल्या फलित रुतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, आणि एमएस धोनी दिसतील. खालच्या फळीत एन जगदीशन, रवींद्र जडेजा यांच्यावर धावा करण्याची जबाबदारी असेल. इमरान ताहीरला देखील आजच्या सामन्यात संधी मिळाली आहे. ताहीरचा आयपीएल 13मधील हा पहिला सामना आहे.
पाहा सुपर किंग्स आणि एमआय प्लेइंग इलेव्हन
चेन्नई सुपर किंग्स: सॅम कुरन, फाफ डु प्लेसिस, रुतुराज गायकवाड, अंबाती रायडू, एमएस धोनी (कॅप्टन, विकेटकीपर), एन जगदीशन, रवींद्र जडेजा, दीपक चाहर, जोश हेजलवुड, इमरान ताहीर आणि शार्दुल ठाकुर.
मुंबई इंडियन्स: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सौरभ तिवारी, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, कीरोन पोलार्ड (कॅप्टन), क्रुणाल पांड्या, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, नाथन कूल्टर-नाइल.