CSK vs DC, IPL 2020 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Disney+ Hotstar वर
चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: File Image)

इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आमने सामने येतील. चेन्नई आणि दिल्लीमधील आजचा सामना अनुभव आणि युवा प्रतिभेमधील सामना असेल. चेन्नईचे नेतृत्व एमएस धोनी (MS Dhoni) तर दिल्लीची धुरा युवा श्रेयस अय्यरकडे (Shreyas Iyer) आहे. आयपीएलच्या (IPL) आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Dubai International Stadium) आमने-सामने येतील. सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल. भारतात प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. आपण या सामन्याचे थेट प्रवाह Disney+ Hotstar अ‍ॅपवर पाहू शकता. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (IPL 2020: CSKला धक्का! अंबाती रायुडू अजून एका सामन्याला मुकणार, फलंदाजाच्या दुखापतीवर सीईओ कासी विश्वनाथन यांनी दिला अपडेट)

आयपीएलच्या 13 व्या हंगामाची विजयाने सुरुवात करण्याऱ्या सीएसकेला दुसर्‍या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. रॉयल्सविरुद्ध सामन्यात धावांचा पाठलाग करताना टीकेला सामोरे जाणारा सीएसके कर्णधार महेंद्र सिंह धोनी आज दिल्ली कॅपिटलिजविरूद्ध सामना जिंकण्याच्या उद्देशाने मैदानावर उतरेल. सामन्यापूर्वी चेन्नईसाठी एक वाईट बातमी समोर आली की त्यांचा फलंदाज अंबाती रायुडू हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे दिल्लीविरुद्ध सामन्यातून बाहेर पडला आहे. चेन्नईप्रमाणेच दिल्लीचीही अशीच अवस्था आहे आणि असे मानले जात आहे की दुखापतीमुळे किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळू न शकलेला संघाचा स्टार वेगवान गोलंदाज इशांत शर्मा चेन्नईविरुद्ध देखील खेळू शकणार नाही. तथापि, वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे संघाने पंजाबला सुपर ओव्हरमध्ये हरवून स्पर्धेत विजयी सलामी दिली.

सीएसके संघ: महेंद्र सिंह धोनी (कॅप्टन), अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्रावो, फाफ डु प्लेसिस, इमरान ताहिर, नारायण जगदीशन, कर्ण शर्मा, केदार जाधव, लुंगी एनगिडी, मिशेल सॅटनर, मोनू कुमार, मुरली विजय, रविंद्र जडेजा, रुतुराज गायकवाड़, शेन वॉटसन, शार्दुल ठाकुर, सॅम कुरन, पियुष चावला, जोश हेजलवुड आणि आर साइ किशोर.

दिल्ली कॅपिटल्स संघ: श्रेयस अय्यर (कॅप्टन), कगीसो रबाडा, मार्कस स्टोइनिस, संदीप लामिछाने, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, डेनियल सॅम्स, अ‍ॅलेक्स कॅरी, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ललित यादव, आवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, एनरिच नोर्ट्जे, रिषभ पंत, हर्षल पटेल, कीमो पॉल आणि अमित मिश्रा.