क्रिकेट विश्वचषक २०१९ Google Doodle: गूगल डूडल वरही क्रिकेट फिव्हर, लंडन मध्ये होणार Cricket World Cup ला आजपासून सुरूवात
Google Doodle for CWC 2019. (Photo Credits: Google)

Cricket World Cup 2019 Google Doodle: आजपासून सुरू होत असलेल्या ICC Cricket World Cup 2019 स्पर्धेमध्ये गूगलनेही सहभाग  घेत आज सर्च इंजिनवर खास डूडलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी सोहळा असलेल्या या मानाच्या क्रिकेट स्पर्धेत यंदा जगातील दहा संघ सहभाग घेत 48 सामने खेळणार आहेत. आजच्या  गूगल डुडल मध्ये स्टम्प आणि बॉलचा समवेश करत 'गूगल' (Google) साकरले आहे. तर अ‍ॅनिमेशनमध्ये धावत येणारा बॉलर, विकेट पडण्याआधीच बॉल टोलावणारा बॅट्समन याचा समावेश आहे.   लंडनमध्ये आज या स्पर्धेची खास ओपनिंग़ सेरेमनी पार पडणार आहे. इंग्लंडमधील शाही घराणे आणि महाराणी सुद्धा वर्ल्ड कपच्या ओपनिंग सेरेमनीला उपस्थिती लावणार आहे.  PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 चं संपूर्ण वेळापत्रक

आयसीसी क्रिकेट विश्वचषक विशेष गुगल डूडल भारतासह पाकिस्तान, आईसलॅन्ड, दक्षिण आफ्रिका,ऑस्ट्रेलिया,न्युझिलंड आणि यजमान लंडनमध्येही पोहचले आहे. आज वर्ल्डकपचा पहिला सामना इंग्लंड विरूद्ध दक्षिण आफ्रिका असा रंगणार आहे. राऊंड रिबन फॉरमॅटमध्ये सामने रंगणार असल्याने दहाही संघ एकमेकांशी लढणार आहेत. अशाप्रकारे अंतिम टप्प्यात चार संघ सेमिफायनल आणि दोन संघ फायनल्स मध्ये 14 जुलै दिवशी एकमेकांशी लढणार आहे.

भारताचा पहिला सामना 5 जून दिवशी दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे.