ICC ला पात्र लिहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2021 टी-20 वर्ल्ड कप आयोजित करण्याची केली विनंती, यामागील तर्क जाणून घ्या
आयसीसी टी -20 वर्ल्ड कप 2020 ट्रॉफी  (Photo Credits: Getty Images)

कोरोना व्हायरसमुळे यंदा ऑस्ट्रेलियामधील टी-20 विश्वचषक (World Cup) स्थगित होणे जवळजवळ निश्चित आहे. 2020 टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेबद्दल त्यांच्या पसंतीबाबत विचारले असता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) 2022 ऐवजी 2021 च्या आवृत्तीचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे आता म्हटले जात आहे. 2021 स्पर्धेची आवृत्ती सध्या भारत (India) आयोजित करणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कोविड-19 संबंधित विषयांमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष अर्ल एडिंग्स यांनी एक पत्र गुरुवारी आयसीसीच्या आर्थिक आणि वाणिज्यिक व्यवहार समितीला पाठवले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला यंदा बोर्ड स्पर्धेचे आयोजन करण्यास सक्षम नसल्यास कोणते पर्याय श्रेयस्कर आहेत या प्रश्नाचे उत्तर म्हणून हे पत्र लिहिले गेले होते. एडिंग्जने आयसीसीला 2021 च्या उत्तरार्धात म्हणजे जेव्हा भारत टी-20 स्पर्धेचे आयोजन करणार असताना या स्पर्धेचे यजमानपद घ्यायला सांगितले आहे. (ICC Board Meeting: टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनावर अद्यापही टांगती तलवार, आयसीसीची बैठक 10 जूनपर्यंत स्थगित)

टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. पण सध्या स्थिती पाहता ते कठीण दिसत आहे. "ऑस्ट्रेलियायामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रणात असल्याने 2021 मध्ये मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्यास सक्षम होण्याची अधिक खात्री आहे. कोविड संबंधित कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी हे भारताला आणखी एक वर्ष देईल," असे या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, टी -20 विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाबरोबर होस्टिंग राईट्सची देवाणघेवाण करण्याबाबत बीसीसीआयने कोणतीही शक्यता नाकारली आहे.

दुसरीकडे, गुरुवारी आयसीसीने 2020 टी-20 विश्वचषक विषयीचा निर्णय येत्या 10 जूनपर्यंत पुढे ढकलला. आगामी आवृत्तीचे भाग्य ठरविण्याबाबत गुरुवारी झालेल्या बैठकीत पत्र फुटल्यानंतर त्याच्या सुरूवातीच्या दोन तासांत बैठक स्थगित करण्यात आली. बोर्डाच्या समितीला पाठविलेले पत्र फोडण्यामागील प्रकरण उघडकीस आणण्यासाठी काही सदस्यांनी स्वतंत्र चौकशीची मागणी केली असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निवेदनात म्हटले आहे.