रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळण्यामुळे जास्त रोमांच होणार नाही आणि बाजारपेठ करणेही कठीण होईल असा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा (Shoaib Akhtar) विश्वास आहे. सध्या सुरू असलेल्या कोविड-19 (COVID-19) महामारीमुळे अनेक देशांमध्ये रिक्त स्टेडियममध्ये खेळ पुन्हा सुरू झाले आहेत आणि कोरोना व्हायरसचा प्रसार (Coronavirus) रोखण्यासाठी नजीकच्या काळात क्रिकेटही अशाच प्रकारे खेळला जाण्याची शक्यता आहे. करोनाचा फटका जगभरातील क्रीडा विश्वाला बसला आहे. आर्थिक नुकसान लक्षात घेता अनेक देशांमध्ये हळुहळु महत्वाच्या क्रीडा स्पर्धा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. जर्मनीमध्ये नुकतंच बुंडेस्लिगा (Bundesliga) स्पर्धा 16 मे पासून सुरुवातही झाली. हे सामने प्रेक्षकांच्या अनुप्रस्थतीत खेळले जात आहेत. त्यामुळे, फुटबॉल पाठोपाठ आता क्रिकेटचे सामनेही प्रेक्षकांविना खेळवण्याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. मात्र पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएबच्या मते प्रेक्षकांविना सामना खेळण्यास काही अर्थ राहणार नाही. (जोफ्रा आर्चर ने रिकाम्या स्टेडियममध्ये फॅन्सची कमी पूर्ण करण्यासाठी दिली अफलातून आयडिया, पहा काय दिला सल्ला?)
मार्च महिन्यापासून क्रिकेट ठप्प झाले आहे. त्यामुळे, क्रिकेट बोर्डांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आयसीसी आगामी काळात प्रेक्षकांविना सामने खेळवण्यास परवानगी देऊ शकते. या बद्दल शोएब Hello App शी बोलताना म्हणाला, “रिक्त स्टेडियममध्ये क्रिकेट खेळणे हे क्रिकेट बोर्डसाठी व्यवहार्य आणि टिकाऊ असू शकते. पण मला वाटत नाही की आपण यातून काही सध्य करू शकतो. रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळणे म्हणजे वधूविना लग्नासारखे आहे. खेळ खेळण्यासाठी प्रेक्षकांची आवश्यकता आहे. वर्षभरात कोरोनाची परिस्थिती सामान्य होईल अशी आशा आहे.” यापूर्वी, भारतीय कर्णधार विराट कोहलीनेही सांगितले होते की, बंद दाराच्या मागे खेळताना भरलेल्या स्टेडियममध्ये खेळण्याची जादू आणि उत्साहपुन्हा निर्माण करणे कठीण होईल.
कोरोना काळात रिक्त स्टेडियममध्ये क्रिकेट खेळण्यावर खेळाडूंकडून मिश्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. आजवर अनेक खेळाडूंनी इंडियन प्रीमिअर लीगही (आयपील) प्रेक्षकांविना खेळवण्याचा पर्याय समोर ठेवला आहे.