पहिले इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) आणि जगातील सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका रद्द किंवा पुढे ढकलण्यात आली होती आणि आता कोरोना व्हायरसचा परदेशी टी-20 लीगवरही परिणाम दर्शविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये कित्येक महिन्यांनंतर आयोजित केलेल्या लीगचा समावेश आहे. ताजी बातमी वेस्ट इंडीजकडील आहे. कॅरिबियन प्रीमियर लीग (Caribbean Premier League) आयोजकांना 19 ऑगस्टच्या पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार स्पर्धा सुरू करायची आहे परंतु कोविड-19 च्या प्रसारामुळे इतर पर्यायही त्यांनी खुले ठेवले आहेत. पूर्व वेळापत्रकानुसार 19 ऑगस्ट ते 26 सप्टेंबर दरम्यान सीपीएल (CPL) टी-20 स्पर्धा खेळली जाणार आहे. सीपीएलने निवेदनात म्हटले की, "सीपीएलने अलीकडील आठवड्यात आपल्या वैद्यकीय सल्लागारांशी सतत संवाद साधला आहे. ते क्रिकेट वेस्ट इंडीजशी जगभरातील सध्याच्या क्रिकेट स्थितीबद्दलही बोलत आहेत आणि स्पर्धा पुढे नेण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही." (IPL 2020 रद्द करण्याबाबत बीसीसीआय आणि फ्रेंचायझींमध्ये मंगळवारी होणार बैठक, अंतिम निर्णय येण्याची शक्यता)
कॅरोबियन देशांमध्येही कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळली आहेत, परंतु तेथील परिस्थिती युरोपियन देशांपेक्षा चांगली आहे. "सीपीएलचा असा विश्वास आहे की असा निर्णय घेण्याची फारच लवकर वेळ आहे परंतु परिस्थिती सतत बदलत आहे आणि आम्ही कॅरिबियन प्रदेश आणि जगभरातील घटनांवर लक्ष ठेवून आहोत," असे निवेदनात म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, “सध्या सीपीएलचे संघ स्पर्धेच्या पूर्व-नियोजित वेळापत्रकानुसार सुरू करण्याची योजना आखत आहेत. यासह आवश्यकतेनुसार ते पर्यायी योजनांकडेही पहात आहेत."
At present the CPL team are planning for the tournament to take place as scheduled whilst also looking at alternative plans should they be needed. MORE DETAILS ➡️ https://t.co/2uOy94jBOO #CPL20 #CricketPlayedLouder #BiggestPartyInSport pic.twitter.com/qdtHwobnbV
— CPL T20 (@CPL) March 23, 2020
दरम्यान, जगभर कोरोना व्हायरसचा प्रभाव दिसून येत आहे. चीन, इटली आणि इराण सारख्या देशांना याचा सर्वाधिक त्रास झाला आहे. भारतातही कोविड-19 ग्रस्तांची संख्या 500 च्या वर पोहचली असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. कोविड-19 चा विश्वभर अधिकाधिक प्रसार होताना पाहून फुटबॉल, क्रिकेटसह अन्य क्रीडा स्पर्धा स्थगित तर काही रद्द करण्यात आल्या आहेत. या महामारीचा परिणाम आता टोकियोमध्ये जुलै महिन्यात आयोजित होणाऱ्या ऑलिम्पिक खेळांवरही होताना दिसत आहे. खेळाडू आणि अनेक देशांच्या क्रीडा संघटनांच्या मागणीनंतर या खेळांना यंदा स्थगिती देण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.