क्रिस गेल याचा तरुणीसोबत पबमध्ये डान्स, सोशल मीडियावर Video व्हायरल
क्रिस गेल (Photo Credit: Instagram)

क्रिस गेल (Chris Gayle) एक आनंदी-सुदैवी व्यक्तिरेखा आहे आणि आनंद व्यक्त करण्यापासून कधीही मागे हटत नाही. गेल आपल्या फलंदाजीने सर्वांचे मनोरंजनच करत नाही तर त्याला मैदानाबाहेरही जीवनाचा आनंद लुटत असतो. पण या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. जेव्हा गेलच्या हातात बॅट असते तेव्हा गोलंदाजांना त्याची भीती असते. आणि जेव्हा गेल मैदानाच्या बाहेर असतो तेव्हा तो आणि त्याचे साथीदार मजा करताना दिसतात. गेलचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये हा खेळाडू पबमध्ये मस्ती करताना दिसत आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने वेस्ट इंडिजचा (West Indies) तुफान क्रिकेटपटू गेलने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा एक पबचा व्हिडिओ असून गेल यामध्ये डान्सर्सबरोबर मस्ती करताना दिसत आहे. हा व्हिडिओ कुठल्या जागेचा आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

40 वर्षीय गेलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, शिवाय यूजर्सची त्याला पसंतीही मिळत आहे. या व्हिडिओसह युनिव्हर्स बॉसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून निरोप घेण्याचा निर्णय जाहीर केला. आणि सध्या तरुण पिढीमध्ये लोकप्रिय असलेल्या टिक-टॉकवर डेब्यू करणार असल्याचेही सांगितले. इन्स्टाग्रामवरून लॉग आउट केल्यावरही त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला जेथे तो डान्स करताना दिसतोय. याशिवाय, गेल डान्सर्सबरोबर अशा मादक स्टाईलमध्ये दिसला नाही. प्लेबॉय प्रतिमेसाठी प्रसिद्ध असलेल्या गेलने अनेकदा सोशल मीडियावर असे व्हिडिओ शेअर केले आहे. क्रिकेटच्या खेळपट्टीवर चमकदार कामगिरी करणार्‍या गेलला नेहमीच चर्चेत रहायला आवडते. पाहा व्हिडिओ:

दरम्यान, या व्हिडिओवर काहीजण म्हणाले की हा बांग्लादेशची राजधानी ढाका येथील आहेत, जिथे हा गेल सध्या बांग्लादेश प्रीमियर लीग (बीपीएल) मध्ये भाग घेण्यासाठी पोहोचला आहे, तर काहींनी हा व्हिडिओ जमैकामधील असल्याचा दावा केला. गेल सध्या चॅटोग्राम चॅलेंजर्स संघाच्या वतीने बीपीएलमध्ये खेळत आहे.