GT vs CSK (Photo Credit - X)

GT vs CSK IP 2025 67th Match: आयपीएल 2025 मध्ये 67 सामना आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (GT vs CSK) यांच्यात सामना नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे खेळवला जात आहे. गुजरातने आधीच प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. पण गुजरातला पॉइंट्स टेबलमध्ये टॉप-2 मध्ये राहायचे असेल आणि अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग सोपा करायचा असेल, तर त्यांना हा सामना जिंकावाच लागेल. त्याच वेळी, सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीलाही त्याच्या संघाने स्पर्धेचा शेवट विजयाने करावा असे वाटते. हा एमएस धोनीचा शेवटचा सामना असू शकतो. धोनी पुढील हंगामात खेळेल का, हाही प्रश्न आहे. पण सध्या तरी सर्वांचे लक्ष जीटी विरुद्ध सीएसके सामन्याच्या निकालावर असेल. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, जेराल्ड कोएत्झी, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, अर्शद खान, प्रसीद कृष्णा

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): आयुष म्हात्रे, डेव्हॉन कॉनवे, उर्विल पटेल, रवींद्र जडेजा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, दीपक हुडा, एमएस धोनी (विकेटकीपर/कर्णधार), नूर अहमद, अंशुल कंबोज, खलील अहमद