India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team Pune Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 24 ऑक्टोबर 2024 (गुरुवार) पासून सुरू होणार आहे. सध्या, भारतीय संघ या मालिकेत 1-0 ने पिछाडीवर आहे, कारण बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत त्यांना 8 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार असून मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघासाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. (हे देखील वाचा: India vs New Zealand 2nd Test 2024 Weather Report: पुण्यात पावसाची किती शक्यता? सामन्याच्या एक दिवस आधी जाणून घ्या हवामान अहवाल)
राहुल कि सरफराज कोणाल मिळणार संधी
टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल अपेक्षित आहेत. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल डावाची सुरुवात करतील, तर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. त्याचबरोबर शुभमन गिल आता पूर्णपणे तंदुरुस्त असून तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे. त्याच्या पुनरागमनामुळे संघासमोर केएल राहुल आणि सरफराज खान यांच्यापैकी एकाची निवड करण्याचे आव्हान असेल. सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांच्या विधानांवरून असे सूचित होते की संघ केएल राहुलला आणखी एक संधी देऊ इच्छित आहे, याचा अर्थ मागील सामन्यात 150 धावा करणाऱ्या सरफराज खानला बाहेर बसावे लागेल. ऋषभ पंतही पूर्णपणे तंदुरुस्त असून तो विकेटकीपिंग करणार आहे.
चार फिरकी गोलंदाजांसह उतरणार मैदानात
खेळपट्टीचे स्वरूप लक्षात घेता भारतीय संघ चार फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. खराब फॉर्ममध्ये झगडत असलेल्या मोहम्मद सिराजच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा समावेश केला जाऊ शकतो. सुंदर हा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, जो संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही मजबूत करेल.
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार).