IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात 15 ऑक्टोबर रोजी होणार्या वनडे विश्वचषक (ODI World Cup 2023) सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे. बीसीसीआय (BCCI) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) नव्या तारखेवर सहमती दर्शवल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची तारीखही बदलण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आता 15 ऑक्टोबर ऐवजी 14 ऑगस्टला होणार आहे. एका वृत्तसंस्थेने या वृत्तावर शिक्कामोर्तब केले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही तारीख बदलण्याचे मान्य केले आहे. नवरात्रीला लक्षात घेऊन सामन्याची तारीख बदलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना 14 ऑक्टोबरला होणार आहे.
Pakistan's re-scheduled matches in World Cup 2023 [RevSportz]:
Oct 6 - PAK vs NED in Hyderabad.
Oct 10 - PAK vs SL in Hyderabad.
Oct 14 - PAK vs IND in Ahmedabad. pic.twitter.com/oPxdrF1Rfr
— Ramdev Royals (@PragadaRamdev) August 2, 2023
सुरक्षा कारणांमुळे तारीख बदलली
वास्तविक, सुरक्षेच्या कारणास्तव भारत पाकिस्तान सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे. नवरात्रीचा पहिला दिवस सुरू असताना 15 ऑक्टोबर रोजी दोन्ही संघांमधील पहिला सामना खेळवला जाणार असल्याबद्दल सुरक्षा यंत्रणांनी चिंता व्यक्त केली होती. अशा स्थितीत पुरेशी सुरक्षा पुरवणे कठीण होईल. त्यामुळे सामन्याची तारीख बदलण्याचा सल्ला देण्यात आला. ज्यावर आयसीसी सहमत झाली आणि बीसीसीआयने पीसीबीशी संपर्क साधला. यानंतर दोन्ही मंडळांनी सामन्याची तारीख बदलण्यास सहमती दर्शवली. आता हा सामना एक दिवस आधी होणार आहे.
5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाला होणार सुरुवात
एकदिवसीय विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारत 8 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. दोन्ही संघांमधील पहिला सामना चेन्नईत होणार आहे. (हे देखील वाचा: IND vs WI 3rd ODI: गिल-किशनची आक्रमक खेळी, तिसऱ्या वनडेत भारताचा विंडिजवर मोठा विजय)
श्रीलंका-पाकिस्तान सामन्याची तारीखही बदलली
भारताशिवाय श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची तारीखही बदलण्यात आली आहे. दोन्ही संघांमधील पहिला सामना 12 ऑक्टोबरला होणार होता, मात्र आता हा सामना दोन दिवस आधी 10 ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानच्या संघांनाही त्यांच्या सामन्यासाठी तीन दिवसांचा वेळ मिळणार आहे. याशिवाय अन्य काही संघांच्या सामन्यांच्या तारखाही बदलल्या आहेत. त्यामुळे आयसीसी लवकरच विश्वचषकाचे नवीन वेळापत्रक जाहीर करू शकते.