जसप्रीत बुमराह (Photo Credit: Twitter/T20WorldCup)

Jasprit Bumrah Injury Update: भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) बऱ्याच दिवसांपासून दुखापतग्रस्त आहे. तो सप्टेंबर 2022 नंतरच टीम इंडियातून (Team India) बाहेर पडत आहे. या कारणास्तव तो आशिया कप 2022 आणि T20 विश्वचषक 2022 मध्ये सहभागी होऊ शकला नाही. आता त्याच्याबद्दल एक मोठे अपडेट समोर आले आहे, त्याच्या पाठीवरची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. सध्या तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे, त्यामुळे तो टीम इंडियात पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार जसप्रीत बुमराहची यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून त्याचे ऑपरेशन यशस्वी झाले आहे.

जसप्रीत बुमराहवर उपचार करणारे डॉक्टर त्यांनी इंग्लंडच्या जोफ्रा आर्चर, जेम्स पॅटिसन आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांसारख्या क्रिकेटपटूंवरही उपचार केले आहेत. न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बाँड, जो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षकही आहे, याने बीसीसीआयला या डॉक्टरचे नाव सुचविल्याचे मानले जात आहे. (हे दखील वाचा: Team India Celebrates Holi 2023: टीम इंडियाने अहमदाबादमध्ये खेळली जोरदार होळी, रोहित शर्मा आणि विराट कोहली दिसले नव्या रंगात (पहा व्हिडिओ)

Tweet

इतक्या महिन्यांनंतर संघात करु शकतो पुनरागमन

जसप्रीत बुमराहला सावरण्यासाठी 6 महिने लागू शकतात. यानंतर तो मैदानात परतताना दिसणार आहे. याचा अर्थ बुमराह आयपीएल 2023 मध्ये खेळू शकणार नाही. त्याचवेळी, सप्टेंबरमध्ये होणार्‍या आशिया चषक 2023 मध्ये खेळणे त्याच्यासाठी कठीण आहे, परंतु तो 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असेल.

टीम इंडियासाठी जिंकले अनेक सामने

जसप्रीत बुमराह डावाच्या सुरुवातीला अतिशय किलर गोलंदाजी करतो, त्याच्याकडे अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याचा मार्ग बदलण्याची क्षमता आहे. तो टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे. त्याने भारतासाठी 30 कसोटी सामन्यात 128 विकेट्स, 71 एकदिवसीय सामन्यात 121 बळी आणि 60 टी-20 सामन्यात 70 बळी घेतले आहेत. त्याने भारतीय संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत.