Women's T20 World Cup 2024 Prize Money: पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये 'भेदभाव' असल्याची चर्चा अनेकदा होते. महिला क्रिकेटपटूंनाही पुरुष क्रिकेटपटूंइतकाच मानधन मिळायला हवे, असा मुद्दा अनेकदा मांडण्यात आला आहे. आता इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) ने भेदभाव दूर करत महिला टी-20 विश्वचषकासाठी पुरुषांच्या टी-20 विश्वचषकाप्रमाणेच बक्षीस रक्कम जाहीर केली. या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा करताना, आयसीसीने सांगितले की या स्पर्धेसाठी एकूण US $ 7,958,080 (सुमारे 66 कोटी 30 लाख रुपये) बक्षीस पूल ठेवण्यात आले आहे, जे मागील वेळेच्या म्हणजेच 2023 महिला टी-20 विश्वचषकाच्या दुप्पट आहे.
आता 2024 महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या संघाला 2.34 दशलक्ष अमेरिकन डॉलर (सुमारे 20 कोटी रुपये) दिले जातील. त्याच वेळी, 2023 महिला टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला फक्त 1 दशलक्ष यूएस डॉलर (सुमारे 8.5 कोटी रुपये) बक्षीस देण्यात आले होते. यावेळी म्हणजे 2024 मध्ये विजेत्या संघाला 134 टक्के अधिक बक्षीस रक्कम मिळेल.
The biggest-ever prize money pool put forward for ICC Women’s #T20WorldCup 2024 👀
More 👉 https://t.co/DqUUfpvjag pic.twitter.com/wDl8NC4e2H
— ICC (@ICC) September 18, 2024
उपविजेत्या संघाला 1.17 मिलियन अमेरिकन डॉलर (सुमारे 10 कोटी रुपये) दिले जातील. उपविजेत्या संघालाही गतवेळच्या तुलनेत 134 टक्के अधिक पैसे मिळतील. याशिवाय इतर संघांना मिळणाऱ्या बक्षिसांच्या रकमेतही वाढ झाली आहे. (हे देखील वाचा: PAK W vs SA W 2nd T20I 2024 Live Streaming: पाकिस्तान महिला संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार? या सामन्याचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहायचे ते घ्या जाणून)
बक्षीस रकमेची घोषणा करताना, आयसीसीने सांगितले की, "आयसीसी महिला T20 विश्वचषक 2024 ही पहिली आयसीसी स्पर्धा असेल जिथे महिलांना पुरूषांच्या बरोबरीने बक्षीस रक्कम मिळेल, ही खेळाच्या इतिहासातील एक महत्त्वाची कामगिरी आहे."
3 ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे
आम्ही तुम्हाला सांगतो की 2024 महिला टी-20 विश्वचषक 03 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, तर अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. या स्पर्धेत एकूण 20 साखळी सामने खेळवले जाणार आहेत. याशिवाय दोन उपांत्य फेरी आणि एक अंतिम फेरी होणार आहे. ही स्पर्धा यूएईमध्ये खेळवली जाईल, जी यापूर्वी बांगलादेशमध्ये खेळली जाणार होती. बांगलादेशातील खराब परिस्थितीमुळे आयसीसीने ही स्पर्धा यूएईला हलवली होती.