RCB vs KKR, IPL 2024 10th Match Stats And Record Preview: बेंगळुरू- कोलकाता मध्ये होणार लढत, आजच्या सामन्यात होऊ शकतात हे मोठे विक्रम; येथे पाहा आकडेवारी
KKR Vs RCB (Photo Credits-Twitter)

RCB vs KKR, IPL 2024 10th Match: इंडियन प्रीमियर लीगच्या 17व्या हंगामातील (IPL 2024) दहावा सामना आज म्हणजेच 29 मार्च रोजी बेंगळुरू (Bengaluru) येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M Chinnaswamy Stadium) खेळवला जाईल. या सामन्यात विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स (RCB vs KKR) संघ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. (हे देखील वाचा: RCB vs KKR Head To Head: आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार रोमांचक सामना, येथे पाहा हेड टू हेड आकडेवारी)

आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' मोठे विक्रम

केकेआरविरुद्ध तीन षटकार मारण्यात कोहली यशस्वी ठरला तर तो आयपीएलमध्ये कोणत्याही फ्रँचायझीसाठी सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनेल.

टी-20 क्रिकेटमध्ये, कोलकाता नाईट रायडर्सचा अनुभवी गोलंदाज सुनील नारायण आपला 500 वा टी-20 सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा अनुभवी फलंदाज व्यंकटेश अय्यरला 1000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी आणखी 37 धावांची गरज आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला आयपीएलमध्ये 100 षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी एका षटकाराची गरज आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलला आयपीएलमध्ये 100 बळींचा टप्पा गाठण्यासाठी दोन बळींची गरज आहे.

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज दिनेश कार्तिकला 450 चौकारांचा टप्पा गाठण्यासाठी आणखी पाच चौकारांची गरज आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसला आयपीएलमध्ये 150 षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी आणखी पाच षटकारांची गरज आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज दिनेश कार्तिकला आयपीएलमध्ये 150 षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी सात षटकारांची गरज आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसला आयपीएलमध्ये 400 चौकारांचा टप्पा गाठण्यासाठी आणखी दहा चौकारांची गरज आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा प्राणघातक अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला आयपीएलमध्ये 50 झेल गाठण्यासाठी आणखी पाच झेलांची गरज आहे.

कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला आयपीएलमध्ये 450 चौकारांचा टप्पा गाठण्यासाठी आणखी दहा चौकारांची गरज आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये, कोलकाता नाइट रायडर्सचा स्टार फलंदाज नितीश राणाला 4500 धावांचा टप्पा गाठण्यासाठी आणखी 13 धावांची गरज आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये, कोलकाता नाइट रायडर्सचा स्टार फलंदाज रहमानउल्ला गुरबाजला 4000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी आणखी 15 धावांची गरज आहे.