IPL Update: चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याच्या आवाहनादरम्यान VIVO स्पॉन्सरशीपविषयी BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर
विवो आणि आयपीएल (Photo Credit: Twitter/PTI)

लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत (India) आणि चिनी (China) सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर भारतात सर्वत्र चिनी उत्पादनांच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) देखील क्रिकेटची भारतातील लोकप्रियता आणि देशातील भावना लक्षात घेता प्रतिक्रिया देण्याची अपेक्षा केली जात आहे. देशाच्या क्रिकेट संघटनेने अलीकडेच खुलासा केला आहे की जर भारत सरकारने चिनी उत्पादन आणि प्रायोजकांवर ब्लँकेट बंदी घातली तर ते इंडियन प्रीमियर लीगचे (Indian Premier League) प्रायोजक म्हणून विवोपासून मुक्त होतील. "आम्हाला देशातील भावना समजल्या आहेत आणि आयपीएलच्या स्पॉन्सरशीपवरही टीका केली जाऊ शकते परंतु अद्याप आम्हाला काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात आहेत," बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. आयपीएलची मुख्य स्पॉन्सरशीप विवो या चिनी कंपनीची आहे आणि देशातलं सध्याचं वातावरण पाहता, बीसीसीायनेही याप्रकरणी सावध भूमिका घेण्याचं ठरवलं. (चीनच्या कंपनीला दिलेले 471 कोटींचे कॉन्ट्रॅक्ट भारतीय रेल्वे कडून रद्द; समोर आले 'हे' कारण)

विवो कंपनी आणि बीसीसीआयमध्ये 5 वर्षांचा करार झाला आहे. यानुसार प्रत्येक वर्षी बीसीसीआयला विवो कंपनीकडून 440 कोटी रुपये मिळतात. मिळणारा पैसा चिनी कंपनीकडून येत असला तरीही तो भारतीय अर्थव्यवस्थेच्या कामाला येत असल्याचं धुमल म्हणाले. भारतात अनेक ठिकाणी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची सुरुवात झाली असली तरी धुमलनुसार बीसीसीआय सरकारकडून काही स्पष्ट सूचनांच्या प्रतीक्षेत आहे. विवो आणि बीसीसीआयमधील करार 2022 मध्ये संपणार आहे. धुमल म्हणाले, “जेव्हा तुम्ही भावनिक होऊन विचार करता त्यावेळी तर्क आणि विचार मागे पडतात. चिनी कंपनीला पाठींबा देणं आणि भारतीय स्पर्धेसाठी त्यांची मदत घेणं या गोष्टींमधला फरक आपल्याला समजावून घ्यावा लागेल. चिनी कंपनी भारतात आपलं जे काही उत्पादन विकते. त्यामधून मिळणाऱ्या पैशाचा काही भाग ही कंपनी बीसीसीआयला स्पॉन्सरशीपच्या स्वरुपात देते. या स्पॉन्सरशीपच्या पैशांसाठी बीसीसीआय नित्यनियमाने कर भरत आहे. त्यामुळे एका अर्थाने हा पैसा भारताच्याच कामी येत आहे.”

"चिनी कंपन्यांकडून येणाऱ्या पैशातून भारतीय क्रिकेटला फायदा होणार असेल तर याबद्दल काही वावगं वाटायला नको. वैय्यक्तीत रित्या चिनी मी मालावर बहिष्कार घालण्याच्या समर्थनार्थ आहे. ज्या-ज्या ठिकाणी सरकारला आमची गरज आहे तिकडे आम्ही सरकारसोबत आहोत. पण, बीसीसीआय भारतीय कंपन्यांनाही तितकाच पाठींबा देते. काही वर्षांपूर्वी 'ओप्पो' या कंपनीसोबतचा करार संपल्यानंतर Byju’s या भारतीय कंपनीकडे भारतीय संघाची स्पॉन्सरशीप देणार आली आहे. बीसीसीआय कोणत्याही पद्धतीने चिनी कंपन्यांना मदत करत नसून भारतीय क्रिकेटसाठी त्यांच्या पैशाचा वापर करत असल्याचं धुमल यांनी म्हटलं.