Team India Schedule 2024-25: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2024-2025 देशांतर्गत हंगामासाठी टीम इंडियाचे (Team India) वेळापत्रक जाहीर केले आहे. भारताच्या देशांतर्गत हंगामाची सुरुवात सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेने होईल आणि टीम इंडियाला त्याच संघासोबत 3 टी-20 सामनेही खेळावे लागतील. याशिवाय भारतीय संघ यावर्षी न्यूझीलंड आणि 2025 च्या सुरुवातीला इंग्लंडचे यजमानपद भूषवणार आहे. या देशांतर्गत हंगामात भारत 5 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 8 टी-20 सामने खेळणार आहे. (हे देखील वाचा: IND vs AFG T20 WC 2024 Super 8 Live Streaming Online: भारतासमोर अफगाणिस्तानचे आव्हान, सुपर 8 सामना मोफत पाहायचा असेल तर करावे लागेल हे काम)
🚨 NEWS 🚨
BCCI announces fixtures for #TeamIndia (Senior Men) international home season 2024-25.
All the details 🔽 @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) June 20, 2024
भारत तीन देशांचे यजमानपद भूषवणार आहे
बांगलादेश: भारतीय संघ सप्टेंबर महिन्यात प्रथम बांगलादेशचे यजमानपद भूषवणार आहे. हा दौरा 19 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नई आणि कानपूर येथे 2 कसोटी सामने होणार आहेत. आणि 6 ते 12 ऑक्टोबर दरम्यान दोन्ही संघ 3 टी-20 सामन्यांमध्ये आमनेसामने येतील. हे 3 टी-20 सामने अनुक्रमे धर्मशाला, दिल्ली आणि हैदराबाद येथे आयोजित केले जातील.
न्यूझीलंड: बांगलादेशविरुद्धची मालिका संपल्यानंतर 4 दिवसांनी भारतीय संघ न्यूझीलंडसोबत 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात करणार आहे. किवी संघ 16 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत भारतासोबत 3 कसोटी सामने खेळणार आहे. पहिला सामना बेंगळुरूमध्ये, दुसरा पुण्यात आणि तिसरा कसोटी सामना मुंबईत होणार आहे.
इंग्लंड: 2025 च्या नवीन वर्षात भारतासमोर पहिले आव्हान इंग्लंडचे असेल. इंग्लंडचा भारत दौरा 22 जानेवारीपासून सुरू होईल आणि 12 फेब्रुवारीला संपेल. सुमारे 3 आठवड्यांच्या आत भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जातील. या आठही सामन्यांचे यजमानपद आठ वेगवेगळ्या मैदानांवर सोपवण्यात आले आहे.
भारत झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार टी-20 मालिका
या देशांतर्गत हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. टी-20 विश्वचषक 2024 संपल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी भारत झिम्बाब्वेला भेट देणार आहे. 6 जुलै ते 14 जुलै दरम्यान दोन्ही संघांमध्ये 5 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह संघातील अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.