Team India (Photo Credit - X)

Indian Cricket Team Home Schedule 2025: बीसीसीआयने (BCCI) बुधवारी 2025 साठी भारतीय संघाचे घरच्या मैदानावरील वेळापत्रक जाहीर केले. भारत ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध (IND vs WI) घरच्या हंगामाची सुरुवात करेल. जिथे दोन्ही संघांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका होईल. यानंतर, नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यावर (IND vs SA) येईल. दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळले जातील. (हे देखील वाचा: Rohit Sharma आणि Virat Kohliचा A+ ग्रेड कायम; Shreyas Iyer केंद्रीय करारात परतणार)

वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका येणार भारत दोऱ्यावर

भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतील पहिला सामना 2 ऑक्टोबरपासून खेळला जाईल. तर दुसरा सामना 10 ऑक्टोबरपासून सुरू होईल. यानंतर, दक्षिण आफ्रिकेसोबत कसोटी मालिका 14 नोव्हेंबरपासून सुरू होईल. एकदिवसीय मालिका 30 नोव्हेंबरपासून सुरू होईल. तर टी-20 मालिका 9 डिसेंबरपासून सुरू होईल. भारताचा घरचा हंगाम 19 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्याने संपेल.

भारतीय संघाचे 2025 च्या घरच्या मैदानाचे वेळापत्रक

वेस्ट इंडिजचा भारत दौरा -

दक्षिण आफ्रिका भारत दौरा -

भारतीय संघ घरच्या हंगामापूर्वी इंग्लंडचा दौरा करणार 

घरच्या हंगामाला सुरुवात करण्यापूर्वी भारतीय संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला जाईल. दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. जी 20 जूनपासून सुरू होईल. कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 31 जुलै रोजी खेळला जाईल.