टीम इंडिया (Photo Credits: IANS)

बहूप्रतिक्षित आणि बहूचर्चित अशा वेस्ट इंडिज दौ-यासाठी (West Indies) भारतीय क्रिकेट संघामध्ये कोणाची वर्णी लागणार, या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.  टीम इंडियाची (Indian Cricket Team) बीसीसीआय (BCCI) सोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत वेस्ट इंडिज दौ-यासाठी कोणाकोणाची निवड करण्यात आली हे जाहीर करण्यात आले आहे. या दौ-यासाठी विराट कोहलीचीच कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

तसेच महेंद्रसिंग धोनी च्या जागी कोणाची वर्णी लागणार याचीही सर्वांना उत्सुकता आहे. तर BCCI ने जाहीर केलेल्या यादी प्रमाणे ऋषभ पंत याची विकेटकिपर म्हणून वर्णी लागली आहे. टीम इंडिया चा वेस्ट इंडिज दौरा 3 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. ज्यात तीन T20 International, तीन वनडे आणि दोन टेस्ट सामन्यांचा समावेश असेल. हेही वाचाIndia vs West Indies Series 2019 Schedule: टीम इंडिया च्या वेस्ट इंडिज दौ-या मधील सगळ्या सामन्यांचे वेळापत्रक

 1. टीम इंडिया T20 संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (विकेटकिपर), क्रुणाल पांड्या, रवींद्र जडेजा, वाशिंगटन सुंदर, राहुल चाहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चाहर अहमद, दीपक चाहर , नवदीप सैनी.

2. टीम इंडिया वनडे संघ:  विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद , नवदीप सैनी

3. टीम इंडिया टेस्ट संघ: विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप कर्णधार), मयंक अग्रवाल, केएल राहुल, सी पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (विकेटकिपर) रिद्धिमान साहा (विकेटकिपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.

येत्या 3 ऑगस्टला टीम इंडिया वेस्ट इंडिज दौ-यासाठी रवाना होईल. टी20 आणि वन डे साठी रोहित शर्मा उप कर्णधार पदी असेल. तर 2 टेस्ट सामन्यांसाठी अजिंक्य रहाणे उपकर्णधार असेल. हार्दिक पांड्या ला या दोन्ही सामन्यांमध्ये आराम देण्यात आला आहे.