आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकचा थरार संपल्यानंतर आता द्विपक्षीय मालिकेचे वेळ आले आहे. विश्वचषकच्या सेमीफाइनलमधून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघ (Indian Team) आता वेस्ट इंडिज (West Indies) दौर्यावर जाणार आहे. टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा 3 ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. या दरम्यान, भारतीय संघ 3-वनडे, 3-टी-२० आणि 2 टेस्ट मालिका खेळणार आहे. दरम्यान, यंदाच्या वेस्ट इंडिज दौर्यासाठी काही नवीन युवा खेळाडूंची निवड होण्याची शक्यता आहे. तर टीम इंडियाचे सीनिअर खेळाडू-जसप्रीत बुमरा, एम एस धोनी आणि अन्य काहींना विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. (IND vs WI: कर्णधारपद जाणार कळताच विराट कोहली पूर्ण वेस्ट इंडिज दौर्यासाठी तयार, संपूर्ण सिरीज खेळण्याचा घेतला निर्णय)

वेस्ट इंडिज दौऱ्यातील कसोटी मालिकेला 22 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. विंडीज दौऱ्यात मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ , दीपक चहर, खलील अहमद, नवदीप सैनी, आवेश खान, राहुल चहर, मयांक मार्कंडे आणि श्रेयस गोपाळ यांना संधी मिळू शकते. संघाच्या वेस्ट इंडिज दौर्या आधी आपण पाहूया दौर्यामधील सगळ्या सामन्यांचे वेळापत्रक:

ऑगस्ट 3: वेस्ट इंडिज विरुद्ध भारत, पहिली टी-२०, रा 8

ऑगस्ट 4: वेस्ट इंडिज विरुद्ध भारत, दुसरी टी-२०, रा 8

ऑगस्ट 6: वेस्ट इंडिज विरुद्ध भारत, तिसरी टी-२०, रा 8

ऑगस्ट 8: वेस्ट इंडिज विरुद्ध भारत, पहिली वनडे, रा 7

ऑगस्ट 11: वेस्ट इंडिज विरुद्ध भारत, दुसरी वनडे, रा 7

ऑगस्ट 14: वेस्ट इंडिज विरुद्ध भारत, तिसरी वनडे, रा 7

ऑगस्ट 22-26: वेस्ट इंडिज विरुद्ध भारत, पहिली टेस्ट, रा 7

ऑगस्ट 30-सप्टेंबर 3: वेस्ट इंडिज विरुद्ध भारत, दुसरी टेस्ट, रा 8