CAA Protest: नागरिकत्व कायद्याविरूद्ध देशभर आंदोलन कायम; सर्वोच्च न्यायालयात आज होणार सुनावणी
Curfew in Assam (Photo Credits: IANS)

Citizenship (Amendment) Act, 2019 Protest:  नागरिकत्व कायदा भारतामध्ये मंजूर झाल्यानंतर देशभरात त्याच्याविरूद्ध आंदोलनाची लाट पसरत आहे. सुरूवातीला ईशान्य भारतामध्ये असलेले हे आंदोलन हळूहळू पश्चिम बंगाल सह आता दिल्ली पर्यंत येऊन पोहचलं आहे. दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी लाठी चार्ज केला. त्यानंतर या नागरिकत्व कायद्याला होणारा विरोध आता देशभर पसरत आहे. आज सर्वोच्च न्यायालयात या हिंसक आंदोलनाविरूद्ध सुनावणी होणार आहे. दरम्यान दिब्रुगडमध्ये कर्फ्यु काही वेळासाठी हटवण्यात येणार आहे. पण पश्चिम बंगालमध्ये संध्याकाळपर्यंत इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. CAA and NRC: सोनिया गांधी यांचं गृहमंत्री अमित शाह यांना जाहीर आव्हान, 'हिंमत असेल तर इशान्य भारतात जाऊन दाखवा'.

आज देशभरातील हिंसक घटनांकडे लक्ष वेधण्यासाठी हंगामी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी सर्वपक्षीय शिष्टमंडळासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. दरम्यान आज सकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत दिब्रुगडमध्ये कर्फ्यू हटवण्यात आली आहे. तसंच पश्चिम बंगालमध्ये आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हावडा जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. काल (16 डिसेंबर) मुंबईमध्येही आयआयटी बॉम्बे, टाटा समाजविज्ञान केंद्राच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली पोलिसांच्या लाठीचार्ज विरूद्ध निषेध नोंदवला आहे.

ANI Tweet  

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीदेखील दिल्लीमध्ये इंडिया गेट येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी, अहमद पटेल, के. के. वेणुगोपाळ यांच्यासोबत बसून दोन तास मूकनिषेध केला. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अफवांवर विश्वास न ठेवता कायद्याचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.