Anjali Guru Sanjana Jaan या Transwoman ला Bombay High Court ने  महिलांसाठी राखीव वॉर्डमधून ग्रामपंचायत निवडणूक लढण्यास ठरवले पात्र
Mumbai High Court (Photo Credit: ANI)

बॉम्बे हाय कोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने (The Bombay High Court Aurangabad bench) अंजली गुरु संजना जान (Anjali Guru Sanjana Jaan) या ट्रान्सवूमन व्यक्तीला जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीची निवडणूक खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असलेल्या वॉर्डामधून लढण्यास पात्र ठरवून एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या निकालामध्ये व्यक्तीच्या मुलभूत हक्कांचे रक्षण करण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे.

निवडणूकीसाठी अर्ज केल्यानंतर रिटर्निंग ऑफिसरने अंजली गुरु संजना जान चा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर तिने न्यायालयात धाव घेतली. रविंद घुगे या न्यायाधीशांनी तिची याचिका 2 जानेवारी 2021 दिवशी वैध मानली. त्यानंतर त्यावर सुनावणी झाली.

नॉमिनेशन फॉर्ममध्ये अंजली गुरु संजना जान ने स्त्री लिंग निवडलं आणि खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असलेल्या वॉर्डामधून लढण्यासअर्ज सादर केला. दरम्यान पंचायत निवडणूकांमध्ये तृतीयपंथीय असं लिंग नाही, अर्जदार तृतीयपंथीय आहे असे कारण पुढे करत रिटर्निंग ऑफिसरने अर्ज रद्द केला. दरम्यान अंजलीचे वकील अ‍ॅड. ए.पी. भंडारी यांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार सार्‍या कारणांसाठी याचिकाकर्त्याकडून स्त्री हेच लिंग निवडण्यात आले होते. ते पुढे देखील कायम ठेवले जाईल. बॉलिवूड डिझायनर Swapnil Shinde आता Transwoman Saisha; अभिनेत्री सई ताम्हणकर सह बॉलिवूड कलाकारांनी पाठिंबा दर्शवत केलं कौतुक.

मागील वर्षीच तृतीयपंथीयांच्या हक्क रक्षणाचा कायदा (Transgender Persons Protection of Rights Act) आणि तृतीयपंथीयांना स्वतंत्रपणे लैंगिक ओळख बहाल करण्यात आली आहे. अंजलीने कायद्याने तिला दिलेला हक्क बजावत स्वत:ला स्त्री मानले आहे व भविष्यात कधीही संधीसाधूपणा करत स्वत:ला पुरुष म्हणवून न घेण्याचे मान्य केल्याने तिला निवडणूकीसाठी पात्र ठरवत असल्याचा निर्णय दिला.