काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना जाहीर आव्हान दिले आहे. केंद्र सरकारने नागरिकता दुरुस्ती (Citizenship amendment act 2019) कायदा बहुमताने संसदेत मंजूर केला. या कायद्याविरोधात देशभरात आंदोलने सुरु आहेत. खास करुन इशान्य भारतामध्ये. राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथेही आंदोलने सुरु असून, जामिया मिलिया इस्लामिया या संस्थेसह देशातील इतर ठिकाणीही आंदोलने सुरु आहेत. खास करुन विद्यार्थी या आंदोलनात अग्रसर आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवरच सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली असून, 'हिंमत असेल तर इशान्य भारतात जाऊन दाखवा', असे जाहीर आव्हानही त्यांनी केंद्रीय ग्रहमंत्री अमित शाह यांना दिले आहे.
एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. या पत्रकात सोनिया गांधी यांनी म्हटले आहे की, सरारमध्ये बसलेलेल लोग जेव्हा हिंसा घडवून आणत आहेत. संविधानावर आक्रमण करत आहेत, युवकांना बेदम मारहाण करत आहेत, देशातील कायदा-सुव्यवस्थेची दिवसाढवळ्या पायमल्ली होत असेल तर देश कसा चालेल?
सोनिया गांधी यांनी देशात सुरु असलेल्या आंदोलनाबाबत म्हटले आहे की, 'संपूर्ण देशात विद्यार्थी आंदोलन करत आहेत. सरकार हे अत्याचार, बेरोजगारी, शैक्षणिक खर्चात वाढ, संस्थांच्या अधिकारांवर मर्यादा अशा एक ना अनेक मुद्द्यांवर विद्यार्थी लढत आहेत.' नागरिकता दुरुस्ती कायद्याला देशभारत होत असलेला विरोध पाहता गृहमंत्री अमित शाह यांनी इशान्य भारतात जाऊन दाखवावे, असे जाहीर आव्हानही अमित शाह यांना सोनिया गांधी यांनी दिले आहे. (हेही वाचा, Citizenship Amendment Act 2019: सुधारित नागरिकत्व कायद्यावरून सुरू असलेली हिंसक निदर्शने दुर्दैवी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चिंताजनक ट्विट)
काँग्रेस ट्विट
मोदी सरकार स्वयं हिंसा व बंटवारे की जननी बन गई है। सरकार ने देश को नफरत की अंधी खाई में धकेल दिया है तथा युवाओं के भविष्य को आग की भट्टी में झुलसा दिया है : कांग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी#BJPBurningBharat pic.twitter.com/wqxijyEtQs
— Congress (@INCIndia) December 16, 2019
नागरिकता सुधारणा विधेयक आणि एनआरसी ही देशाचे तुकडे करण्याची रणनिती आहे. मोदी सरकार संपूर्ण देशात युवकांना उग्रवादी, नक्षलवादी, फुटीरतावादी, देशद्रोही बनवण्याच्या कामी लागले आहे, असा आरोप करत सोनिया गांधी यांनी पुढे म्हटले आहे की, जेव्हा युवाशक्ती आणि विद्यार्थीशक्ती एकत्र येते तेव्हा देशात बदल घडायला सुरुवात होते. भाजप अहंकाही आहे, पोलिसांच्या दबावतंत्राच्या जोरावर मोदी सरकारने सुरु केलेले दमन हे या सरकारच्या अंताची सुरुवात आहे, असेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.