IND vs WI: कर्णधारपद जाणार कळताच विराट कोहली पूर्ण वेस्ट इंडिज दौर्यासाठी तयार, संपूर्ण सिरीज खेळण्याचा घेतला निर्णय
विराट कोहली (Photo Credits: Getty Images)

यंदाच्या आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमध्ये विराट कोहली (Virat Kohli) च्या भारतीय संघाचे आव्हान सेमीफायनलमध्येच संपुष्टात आले. न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध सेमीफाइनलमध्ये पराभव झाला आणि भारताच्या विश्वकप जिंकण्याच्या आशा धुळीस मिळाल्या. त्यानंतर संघात मोठे फेरफार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार, वनडे आणि टी-20 संघाचे नेतृत्व विराटऐवजी रोहित शर्मा (Rohit Sharma) कडे सोपवण्यात यावी अशी चर्चा सुरु झाली. तर, विराटकडे फक्त टेस्ट संघाचे नेतृत्व सोपवण्यात यावे असे म्हटले जात आहे. विश्वचषकनंतर संघ आता वेस्ट इंडिज (West Indies) दौर्यावर जाणार आहे. त्यासाठी कोहलीला विश्रांती देण्याचे बोलले जात होते. पण आपले कर्णधार पद जाणार हे कळताच कोहलीने असे काही केले ज्याची कोणी कल्पना देखील केली नसेल. (India tour of West Indies 2019: एम एस धोनी नसणार वेस्ट इंडिज दौर्यासाठी टीम इंडियाचा भाग; विकेट किपरसाठी पहिली पसंती नाही)

भारताच्या पराभवानंतर टीम इंडियामध्ये दोन गट झाले आहे असे सांगितले जात आहे. एक गट रोहितला पाठिंबा देत आहे. तर दुसरा कोहली-रवि शास्त्री (Ravi Shastri) यांना पराभवासाठी जबाबदार मनात आहे. टीम इंडिया आता वेस्ट इंडिज दौर्यावर जाणार आहे. इंडिजमध्ये भारत 3-वनडे आणि 3 टी-20 सामने खेळणार आहे. यासाठी रोहितकडे नेतृत्व सोपवण्याची शक्यता आहे. पण, आपले कर्णधार पद धोक्यात असल्याचे कळताच कोहली वेस्ट इंडिजमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आणि याबाबत त्याने निवड समितीला देखील कळवले आहे.

दरम्यान, टीम इंडियाच्या विश्वचषकमधील कामगिरीबाबत कोहली आणि मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे बीसीसीआय प्रशासक समितीचे प्रमुख विनोद राय म्हणाले होते. शिवाय, टीम इंडियाच्या कथित गटबाजीवर देखील या बैठकीत चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे.