IPL 2021 दोन नवीन संघ होणार सामील? 24 डिसेंबर रोजी BCCI AGM मध्ये फ्रॅंचायझी संख्या वाढीसह 23 मुद्द्यावर होणार चर्चा
बीसीसीआय (Photo Credits: IANS)

बीसीसीआयने (BCCI) आयपीएलच्या (IPL) 13व्या हंगामाचे युएई (UAE) येथे आयोजन केले आणि आता 2021 मध्ये फ्रँचायझी संख्येत वाढ करण्यासाठी बीसीसीआय तयारीत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे प्रतिनिधी आणि तीन नवीन राष्ट्रीय निवड समितीच्या (National Selection Committee) नियुक्तीशिवाय आयपीएलच्या दोन नव्या फ्रँचायझींच्या समावेशाबद्दल चर्चा करण्यासाठी बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण बैठक (BCCI Annual General Meeting) 24 डिसेंबर रोजी आयोजित केली जाणार आहे. वार्षिक सभेत सर्व राज्य संघटानाची मतं जाणून घेण्यात येणार आहेत. त्यानंतर दोन नव्या संघाचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच अजेंडावर नवीन उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीवरही निर्णय घेतण्यात येईल. सर्वसामान्यांनुसार बीसीसीआयने एजीएम (BCCI AGM) होण्याच्या 21 दिवस अगोदर सर्व संबद्ध घटकांना 23-कलमी अजेंडा पाठविला आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोन नवीन संघांना दहा-संघीय आयपीएल बनवण्यासाठी मान्यता मिळावी ही आहे. (IPL 2021: आयपीएलच्या पुढच्या पर्वात आणखी एका नव्या संघाची भर पडण्याची शक्यता, नवव्या संघासाठी BCCI तयारी करत असल्याचे वृत्त)

असे समजले जात आहे की अदानी ग्रुप आणि संजीव गोएंकाचे आरपीजी (राइझिंग पुणे सुपरजाइंट्सचे मालक) अहमदाबादच्या एका फ्रँचायझीसह नवीन संघांच्या मालकीसाठी इच्छुक आहेत. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आयसीसी आणि आशियाई क्रिकेट कौन्सिलमध्ये बीसीसीआय प्रतिनिधी सेक्रेटरी जय शाह हे जागतिक समित्यांमध्ये बीसीसीआयचे प्रतिनिधी असतील अशी अपेक्षा आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, "निवड समिती हा क्रिकेट समितीचा एक भाग आहे आणि तांत्रिक समितीदेखील तयार करणे आवश्यक आहे. त्या सर्व वैधानिक उपसमिती आहेत."

2021 च्या भारताच्या फ्यूचर टूर्स प्रोग्राम, पुढच्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनाच्या तयारीसह (आयसीसी करप्रणालीचा समावेश) आणि 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश या विषयावरील चर्चा या अजेंड्यात आहे. प्रशासकीय अजेंडावरील मुख्य मुद्दा म्हणजे नवीन उपाध्यक्ष निवडणे, हा पद माहीम वर्मा यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त राहिली आहे. निवड एकमताने होईल अशी अपेक्षा केली जात आहे. तसेच आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलमध्ये नियामक मंडळाच्या दोन प्रतिनिधींना जागा मिळणार आहे.